बेळगाव येथे नवरात्रोत्सवानिमित्त सनातन संस्थेच्या वतीने मार्गदर्शन !

बेळगाव – नवरात्रोत्सवानिमित्त मुतागा आणि निलजी या गावांमध्ये सनातन संस्थेच्या वतीने मार्गदर्शन करण्यात आले. मुतागा येथे ३००, तर नीलजी येथे १०० इतकी उपस्थिती होती.

मुतागा

येथे आधुनिक वैद्या (सौ.) शिल्पा कोठावळे यांनी नवरात्रोत्सवाचे महत्त्व, नवरात्रोत्सवाच्या संदर्भातील शास्त्र यांविषयी मार्गदर्शन केले.

राजमाता जिजाऊ यांच्यासारखी मातृशक्ती घरोघरी निर्माण
होणे आवश्यक ! – रमाकांत कोंडुसकर, बेळगाव जिल्हा अध्यक्ष, श्रीराम सेना

मातृभक्ती जागृत करणारा भारत हा एकमात्र देश आहे. फक्त याच देशात भारतमाता असा उल्लेख करून गौरव केला जातो. राजमाता जिजाऊ यांच्यासारखी मातृशक्ती घरोघरी निर्माण होणे आवश्यक आहे. युवा पिढी सध्या विविध नटांचे आदर्श घेत आहेे; पण ते मोडीत काढून घरोघरी मुलांमध्ये राष्ट्रभक्तीचे संस्कार रुजवले गेले पाहिजेत. तसे झाल्यासच पुन्हा एकदा हिंदूंच्या रक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येऊ शकतील.

भारतीय संस्कृती टिकण्यासाठी गुरुकुल
पद्धत आवश्यक ! – ज्योतिर्लिंग माविकट्टी, पोलीस निरीक्षक

यानंतर मारीहाळ पोलीस ठाण्याचे मंडळ पोलीस निरीक्षक श्री. ज्योतिर्लिंग माविकट्टी यांनी आयोजकांचे कौतुक करत सांगितले की, अशा कार्यक्रमांमुळेच भारतीय संस्कृती टिकून आहे. संस्कृती टिकून रहाण्यासाठी गुरुकुल पद्धत अत्यंत आवश्यक आहे. धर्माचे रक्षण करणे आपलेच दायित्व आहे.

निलजी

येथील कार्यक्रमात समितीच्या वतीने डॉ. अंजेश कणगलेकर यांनी नवरात्रोत्सवाच्या संदर्भात मार्गदर्शन केले. या वेळी गावातील युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत नजीकच्या गावातून धर्मशिक्षण वर्ग चालू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार
अन् गुण आत्मसात करणे आवश्यक ! – रमाकांत कोंडुसकर, श्रीराम सेना

हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व आपण विसरत आहोत. ज्या मातृशक्तीने संस्कार करून आदर्श पिढी घडवणे आवश्यक आहे, ती सध्या घरोघरी दूरचित्रवाहिनीवर संस्कारहीन कार्यक्रम पहाण्यात वेळ घालवते. भारतमातेचे ऋण फेडायचे असल्यास जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार अन् गुण आत्मसात करून आदर्श पिढी निर्माण करणे आवश्यक आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात