नवरात्रोत्सवातील अपप्रकार रोखण्यासाठी प्रत्येकाने स्वतःच्या घरापासून प्रारंभ करावा ! – नगराध्यक्ष बाबासाहेब पाटील

हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांचा आदर्श नवरात्रोत्सव उपक्रम !

तहसीलदार श्री. सानप यांना निवेदन देतांना रणरागिणी
तहसीलदार श्री. सानप यांना निवेदन देतांना रणरागिणी

मलकापूर (जिल्हा कोल्हापूर), ३ ऑक्टोबर (वार्ता.) – नवरात्रोत्सवातील अपप्रकार थांबवून नवरात्रोत्सव आदर्श पद्धतीने साजरा करण्यात यावा, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीप्रणीत रणरागिणी शाखेच्या वतीने नगराध्यक्ष श्री. बाबासाहेब पाटील यांना ३० सप्टेंबर या दिवशी देण्यात आले. या वेळी श्री. पाटील म्हणाले, नवरात्रोत्सवातील अपप्रकार थांबवण्यासाठी प्रत्येकानेच स्वतःच्या घरापासून प्रारंभ करायला हवा. सध्या देवतांची उपासना करणारे अल्प झाले असून मौजमजा करण्यासाठीच आताची पिढी उत्सव साजरे करत आहे. तुम्ही करत असलेले जागृतीचे काम चांगले आहे. मी गावातील सर्व मंडळांना पत्रे पाठवतो. तुम्हीही तुमचे प्रबोधनाचे धार्मिक फ्लेक्स लावावेत.

नगराध्यक्ष श्री. बाबासाहेब पाटील यांना निवेदन देतांना रणरागिणी शाखेच्या महिला
नगराध्यक्ष श्री. बाबासाहेब पाटील यांना
निवेदन देतांना रणरागिणी शाखेच्या महिला

या वेळी ब्राह्मण समाजाच्या सौ. पमाकाकू, सौ. मंजिरी जोशी, सौ. जाई हर्डीकर, कु. रसिका जोशी, सौ. गाडे, तसेच सौ. देशमाने, सौ. माया पाटील, सौ. शशिकला पाटील, सौ. पवार आणि हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

नवरात्रोत्सवातील अपप्रकार रोखण्यासाठी
पोलिसांना बैठक घ्यायला सांगतो ! – तहसीलदार सानप

रणरागिणी शाखेच्या वतीने येथील तहसीलदार श्री. सानप यांनाही वरील मागणीचे निवेदन देण्यात आले. या वेळी श्री. सानप म्हणाले की, तुम्ही करत असलेले कार्य अत्यंत चांगले आहे. पोलिसांना बैठक घ्यायला सांगतो. या वेळी त्यांनी उत्सवांतील काही प्रकार थांबवण्यासाठी प्रयत्न करतांना त्यांना आलेले अनुभव सांगितले. तसेच तुम्ही कधीही या. मी तुम्हाला सहकार्य करीन, असे ते म्हणाले. या वेळी शाहूवाडी येथील माजी सरपंच सौ. प्रभावती मोरे, सौ. शशिकला पाटील, सौ. पवार आणि रणरागिणी शाखेच्या सौ. सुनीता भोपळे, सौ. मंगला हर्डीकर, सौ. राजश्री मगर, सौ. पूजा कुलकर्णी आणि कु. प्रियांका भोपळे आदी उपस्थित होत्या.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात