नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातनच्या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन !

kolhapur_sanatan_bookstall
सनातनच्या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करतांना शुगर मिलचे व्यवस्थापक श्री. शरद शेटे

कोल्हापूर, ३ ऑक्टोबर – नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने येथील शिवाजी पेठेतील श्री महाकाली मंदिरासमोर सनातन-निर्मित उत्पादन आणि ग्रंथ प्रदर्शन लावण्यात आले आहे. १ ऑक्टोबर या दिवशी प्रदर्शनाचे उद्घाटन कसबा बावडा शुगर मिलचे व्यवस्थापक श्री. शरद शेटे यांच्या हस्ते निरांजनाने दीपप्रज्वलन आणि नारळ वाढवून करण्यात आले. या वेळी सनातन संस्थेचे साधक आणि बांधकाम व्यावसायिक श्री. आनंद पाटील, डॉ. मानसिंग शिंदे उपस्थित होते. डॉ. मानसिंग शिंदे यांनी श्री. शरद शेटे अन् श्री महाकाली तालीम मंडळाचे अध्यक्ष श्री. अतुल साळोखे यांना श्री महालक्ष्मीदेवीची प्रतिमा भेट दिली. या वेळी डॉ. शिंदे यांनी वरील मान्यवरांना प्रदर्शनाचा उद्देश आणि सनातनच्या कार्याविषयी माहिती दिली. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने शहरात ७ ठिकाणी असे ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले आहे. याचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन सनातन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.