नोएडा येथे सनातन संस्थेच्या वतीने ११ ठिकाणी श्राद्धपक्षाविषयी प्रबोधन

noida_pravachan_shradhh_photoclrनोएडा – अलीकडे लोकांना श्राद्ध म्हणजे अशास्त्रीय आणि अवास्तव कर्मकांड असल्याचे वाटते. काही जणांना पितरांसाठी श्राद्ध न करता गरिबांना अन्नदान द्यावे किंवा शाळेला देणगी द्यावी, असे वाटते. त्यामुळे श्राद्धाविषयी समाजातील चुकीच्या समजुती दूर करून हिंदूंना धर्मशिक्षण मिळावे, यासाठी सनातन संस्थेच्या वतीने शहरातील, गौतम बुद्धनगर येथे ११ ठिकाणी प्रवचने घेण्यात आली. या प्रवचनांना उत्तम प्रतिसाद मिळाला. यात शाळांमधील शिक्षक, भाविक आदींचा सहभाग होता. ही प्रवचने सनातनचे श्री. अरविंद गुप्ता, सौ. राजरानी माहुर आणि कु. किरण महतो यांनी घेतली.