कराड येथील श्री गजानन नाट्य मंडळाकडून सनातनच्या उपक्रमाचे कौतुक !

1406557679_Artificial-Pond--Vahate-Pani-Visarjan

मोहिमेच्या वेळी कराड नगरीतील मानाचा पहिला गणपति श्री गजानन नाट्य मंडळाने मात्र सनातन संस्थेच्या या प्रबोधनात्मक उपक्रमाविषयी कौतुक केले आणि नारळ अन् पुष्पहार देऊन साधकांचा सत्कार केला. मंडळाचे कार्यकर्ते सनातनच्या प्रबोधनाचे फलक स्वत: हातात धरून ते नदीपर्यंत घेऊन गेले. तेथे असणार्‍या भाविकांना त्यांनी मूर्तींचे विसर्जन वहात्या पाण्यात करण्याचे आवाहन केले. (सनातनच्या प्रबोधनानुसार भाविकांना शास्त्रानुसार कृती करण्याचे आवाहन करणार्‍या श्री गजानन नाट्य मंडळाचे अभिनंदन ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात