चीनमधील पुरामध्ये २५० जणांचा मृत्यू !

दीड लाख कोटी रुपयांची हानी

बीजिंग : चीनमध्ये २३ जूनपासून चालू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पूर आला आहे. २६ प्रांतांतील १ सहस्र शहरे जलमय झाली आहेत. आतापर्यंत पावसामुळे २५० जणांचा मृत्यू झाला आहे, तर १०० जण बेपत्ता आहेत. यात दीड लाख कोटी रुपयांची हानी झाली आहे. चीनच्या इतिहासात अशी हानी होण्याची ही दुसरी घटना आहे. १९९८ मध्ये चीनची अशी हानी झाली होती.

 

महर्षींनी प्रलयकालाविषयी सतर्क करणे

१९.३.२०१६ या दिवशी झालेल्या नाडीवाचन क्रमांक ६७मध्ये महर्षि म्हणतात, हे पूर्ण वर्ष प्रलयकालाचे आणि आपत्तीजनक असणारे आहे.

(चीनमध्ये २३ जूनपासून चालू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पूर आला आहे. या घटनेवरून प्रलयकालाविषयी महर्षींनी केलेले भाष्य किती तंतोतंत आहे, हे लक्षात येते ! – संपादक)