हिंदू अधिवेशनामध्ये हिंदु राष्ट्र चालवू शकणार्‍या भावी पिढीची ओळख !

1
डावीकडून कु. कन्हैया श्रीवास्तव, कु. जयेश कापशीकर, कु. राधा शेळके, कु, वैभवी झरकर, कु. अंबिका हंबर्डे, कु. अमृता मुद्गल

 

विद्याधिराज सभागृह, रामनाथी : पुढील सहस्रो वर्षे अखिल मानवजातीला मार्गदर्शक असलेले हिंदु राष्ट्र चालवण्यासाठी ईश्‍वरी नियोजनानुसार उच्चलोकातून बालकांनी जन्म घेतला आहे. अशा बालकांमध्ये उपजतच राष्ट्र आणि धर्म यांप्रती प्रेम, ईश्‍वराप्रती अनन्यभाव, तसेच साधना करण्याची तीव्र तळमळ असे गुण आहेत. सनातनला आजपर्यंत अशा ५०० बालकांची ओळख झाली असून यांपैकी ६ दैवी (सात्त्विक) बालकांची ओळख येथे चालू असलेल्या पंचम अखिल भारतीय अधिवेशनात उपस्थित धर्माभिमान्यांना करून देण्यात आली.

सेवाभाव, त्याग आणि तत्त्वनिष्ठता आदी गुण
असलेले सनातनच्या रामनाथी आश्रमातील दैवी बालक !

कु. राधा शेळके, कु, वैभवी झरकर, कु. अंबिका हंबर्डे, कु. अमृता मुद्गल, कु. जयेश कापशीकर, कु. कन्हैया श्रीवास्तव या बालसाधकांनी सेवाभाव, त्याग आणि तत्त्वनिष्ठता आदी गुणांमुळे लहान वयातच साधनेत प्रगती केली आहे. या वेळी अन्य दैवी बालकांविषयी माहिती देणारी ध्वनीचित्र-चकती दाखवण्यात आली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात