पुणे येथे प्रबोधनानंतर भाविकांकडून हौदाऐवजी वहात्या पाण्यात श्री गणेशमूर्तींचे विसर्जन !

हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था
यांची ‘आदर्श गणेशोत्सव विसर्जन मोहीम’ !

हिंदु जनजागृती समितीच्या प्रबोधनानंतर
आेंकारेश्‍वर घाटावर संरक्षक कठडे बसवले !

पुणे : हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात ठिकठिकाणी ‘आदर्श गणेशोत्सव मोहीम’ राबवण्यात येत आहे. या अनुषंगाने या मोहिमेच्या अतंर्गत पुणे आणि चिंचवड येथे ६ सप्टेंबर या दिवशी आदर्श गणेशोत्सव विसर्जन मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन भाविकांनी वहात्या पाण्यात विसर्जन केले.

१. येथील गणेशमूर्ती विसर्जन करण्याच्या संदर्भात आेंकारेश्‍वर घाटावरील असुविधा आणि सर्व समस्या हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी विविध वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींच्या निदर्शनास आणून दिल्या. महापालिका प्रशासनाने नदीला पाणी न सोडल्याविषयी, तसेच पालिकेच्या भोंगळ कारभाराविषयी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रसारमाध्यमांना माहिती देण्यात आली. या सर्व घडामोडींची माहिती वृत्तवाहिन्यांवर प्रसिद्ध झाल्यानंतर महापालिका प्रशासन जागे झाले. त्यानंतर त्यांनी आेंकारेश्‍वर पुलावर संरक्षक कठडे बांधण्यास प्रारंभ केला.

२. आेंकारेश्‍वर घाटावर श्रीगणेशमूर्तींचे नदीत विसर्जन करण्यासाठी महापालिकेचे जीवरक्षक उपलब्ध नव्हते, तसेच काही जीवरक्षक लांब उभे असल्याने ते दिसतही नव्हते. या घाटावर संरक्षक कठडे नव्हते. त्यामुळे श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन करणार्‍या भाविकांची सुरक्षा ऐरणीवर आली होती.

३. या वेळी महापालिकेच्या असुविधांविषयी भाविकांनी महापालिका प्रशासनाचा निषेध केला.

महापालिकेचे कर्मचारी आणि पोलीस
यांच्याकडून कृत्रिम हौदात विसर्जन करण्याची बळजोरी !

१. भाविक आेंकारेश्‍वर पुलावर श्रीगणेशमूर्ती विसर्जनासाठी घेऊन आल्यानंतर महापालिकेचे कर्मचारी आणि पोलीस भाविकांना बलपूर्वक सिद्ध केलेल्या कृत्रिम हौदात मूर्तींचे विसर्जन करण्यास भाग पाडत होते. ‘तुम्ही गटारीसारखे पाणी असलेल्या नदीत श्रीगणेशमूर्तींचे कशाला विसर्जन करता. तुम्ही महापालिकेच्या हौदात मूर्तींचे विसर्जन करा’, असे पोलीस भाविकांना सांगत होते. (पोलीस आणि प्रशासन यांनी अशी बळजोरी कधी अन्य पंथियांवर करण्याचे धाडस दाखवले आहे का ? धर्मांधांसमोर नांग्या टाकणारे पोलीस आणि प्रशासन हिंदूंवर मात्र मुर्दुमकी गाजवतात, हे लक्षात घ्या ! हिंदूंच्या धार्मिक बाबींत हस्तक्षेप करणार्‍या ‘निधर्मी’ पोलीस अन् प्रशासनाच्या विरोधात त्यांच्या वरिष्ठांकडे तक्रार करा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

२. त्यामुळे भाविकांचा नाईलाज झाल्याने काही भाविकांना इच्छा नसतांना हौदात मूर्तींचे विसर्जन करावे लागले.

३. भाविकांचे प्रबोधन केल्यावर भाविकांनी कर्मचारी आणि पोलीस यांना न जुमानता शास्त्रानुसार वहात्या पाण्यात श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याला प्राधान्य दिले.

४. महापालिका प्रशासनाने नदीमध्ये पाणी सोडण्याची व्यवस्था न केल्याने नदीतील अल्प पाण्यात मूर्तींचे विसर्जन करावे लागले. (प्रत्येक वर्षी पाऊस न पडल्याने पिण्यास पाणी नसल्याचे कारण पुढे करून काही धर्मद्रोही विसर्जनाच्या दिवशी प्रशासनाला नदीत पाणी सोडण्यास विरोध करतात. यंदा तर भरपूर पाऊस पडूनही प्रशासनाकडून नदीत आवश्यक तेवढे पाणी सोडण्याची व्यवस्था का करण्यात आली नाही, याविषयी हिंदूंनी सनदशीर मार्गाने विचारणा केली पाहिजे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

पुण्यात गणेशोत्सव मंडळ आणि भाविक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था
यांची आदर्श गणेशोत्सव जनजागृती मोहीम !

  • अनेक गणेशोत्सव मंडळांचे अध्यक्ष दैनिक सनातन प्रभातचे वार्षिक वर्गणीदार झाले !
  • फ्लेक्स प्रदर्शन आणि पथनाट्य यांना उदंड प्रतिसाद !
  • सनातनचे ग्रंथ आणि उत्पादन यांच्या संच खरेदीला भाविकांची मोठी मागणी !

पुणे : गणेशोत्सवाच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आदर्श गणेशोत्सव प्रबोधन मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेला गणेशोत्सव मंडळ आणि समाजातील नागरिक यांच्याकडून पुण्यामध्ये उदंड प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे बहुतांश गणेशोत्सव मंडळांनी स्वतःहून पथनाट्य, राष्ट्र आणि धर्म रक्षणावरील प्रदर्शन लावण्याला अनुमती दिली. तसेच काही मंडळांनी गणेशोत्सवाच्या काळात ११ दिवस दैनिक सनातन प्रभातचे वर्गणीदारही होणे पसंत केले. काही गणेशोत्सव मंडळांच्या अध्यक्ष दैनिक सनातन प्रभातचे वार्षिक वर्गणीदारही झाले. सनातन-निर्मित उत्पादने आणि ग्रंथ विक्रीलाही भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेक भाविकांनी सात्त्विक उत्पादनांचे संच खरेदी करण्यासाठी प्रदर्शनाच्या ठिकाणी गर्दी केली होती. तसेच श्री गणेशमूर्ती शाडूची आणि शास्त्रानुसार असण्याविषयी सनातन संस्थेने समाजात प्रबोधन केल्यानंतर त्यालाही समाजातील भाविकांकडून उदंड प्रतिसाद मिळाला. शाडूपासून बनवलेल्या श्री गणेशाच्या मूर्तींचे जलद गतीने वितरण झाले.

१. पथनाट्य तसेच राष्ट्र आणि धर्म यांवरील
फ्लेक्स प्रदर्शन लावण्याची अनेक गणेशोत्सव मंडळांकडून अनुमती !

भोर (जिल्हा पुणे) येथे पिसाळवाडी आणि शिरवळ येथे ५० स्मरणिका, मोहरी येथे ५० स्मरणिका आणि रणरागिणी शाखेअंतर्गत व्याख्यान घेण्यात आले. एक मंडळ साप्ताहिक सनातन प्रभातचे वर्गणीदार झाले. भोर येथे धर्मशिक्षणवर्गातील मुलांकडून आदर्श गणेशोत्सवाच्या संदर्भातील भित्तीपत्रके लावण्यात आली. तसेच वर्गातील एक तरुण धर्माभिमानी पुणे येथे आदर्श गणेशोत्सवाच्या संदर्भात प्रबोधन करण्यासाठी आला होता. भोरमधील ४ साधकांनी २५० पत्रके मंडईमध्ये वितरण केली. नवनाथ मित्र मंडळाचे श्री. महेश पोटे यांनी नियमित दैनिक सनातन प्रभात चालू करण्यास सांगितले.

२. अनेक मंडळाचे अध्यक्ष स्वतःहून
झाले दैनिक सनातन प्रभातचे वर्गणीदार !

पुणे रुग्णालय येथील विसावा मित्र मंडळ यांनी पथनाट्य आणि इतर कोणतेही फ्लेक्स आणि प्रदर्शन लावण्यास अनुमती दिली. जय गजानन मित्र मंडळ, विजय चित्रपटगृह चौक यांनी चलो कश्मीर फ्लेक्स लावण्याची आणि पथनाट्य करण्यासही अनुमती दिली. भरत मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री. बाळासाहेब दाभेकर यांनी १ सहस्र रुपये अर्पण दिले. यातून धर्मशिक्षणाचे ५ फ्लेक्स प्रायोजित केले आहेत आणि १० दिवस मंडळासाठी दैनिक सनातन प्रभात चालू करायला सांगितले. या ठिकाणी काश्मीरप्रश्‍नाविषयीचे फ्लेक्स लावू शकतो, असे ते म्हणाले. शनिवारवाडा आणि महापालिका येथील ग्रंथप्रदर्शनात पत्रकांचे वाटप करण्यात आले.

इंद्रायणीनगर येथील समता मित्र मंडळ, साई प्रतिष्ठान, सुवर्णयुग मित्र मंडळ, गणेश सेवा प्रतिष्ठान (दिघी), गणेश तरुण मित्र मंडळ (भोसरी), शिवछत्रपती प्रतिष्ठान गव्हाणे वस्ती यांनी ७ ते १० सप्टेंबर या कालावधीत रात्री ८ ते ८.३० या वेळेत प्रात्यक्षिक दाखवण्याची मागणी केली. विश्रामबाग मित्र मंडळाने उत्पादनांची खरेदी करून एक भारत अभियान फ्लेक्स लावण्याची मागणी केली. शुक्रवार पेठ येथील वनराज मित्र मंडळाने फ्लेक्स लावण्याची अनुमती दिली.

सेवा मित्र मंडळ, जनजागृती मंडळ आणि शिंदे आळी सार्वजनिक मित्र मंडळाने एक भारत अभियान हे फ्लेक्स लावण्यास अनुमती दिली. तसेच सेवा मित्र मंडळ आणि शिंदे आळी मंडळाने ११ दिवस दैनिक सनातन प्रभात चालू केले. सेवा मित्र मंडळाचे प्रमुख श्री. शिरीष मोहिते यांचे समितीला चांगले सहकार्य मिळाले. त्यांनी हिंदु राष्ट्र स्थापना करण्यासाठी शपथ घेण्याची अनुमती दिली.

शुक्रवार पेठेतील शिवतेज मित्र मंडळ, जय भारत मंडळ आणि योजना युवक तरुण मंडळ यांनी धर्मशिक्षण फलकांची माहिती त्यांना दिल्यास ते स्वतः फलक छापून लावू शकतील, असे त्यांनी सांगितले. पथनाट्य आणि काश्मीर अभियान फ्लेक्स लावण्यासही त्यांनी अनुमती दिली.

एका मंडळाने १० दिवसांमध्ये हवे ते उपक्रम घेण्यास अनुमती देणे !

नाशिक रस्ता येथे एका गणेशोत्सव मंडळाने हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना बोलावून तुम्ही १० दिवसांमध्ये हवे ते उपक्रम घ्या, अशी अनुमती दिली.

बाजीराव रस्ता कक्षाच्या स्थळी धर्मरथ लावण्यास पोलिसांनी तोंडी अनुमती दिली. पोलीस उपनिरीक्षक श्री. जगताप आणि पोलीस हवालदार श्री. सानरे यांनी मोहिमेतील धर्माभिमान्यांना साहाय्य केले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात