मेरांती वादळाचा चीन आणि तैवान यांना फटका !

बीजिंग – सर्वाधिक शक्तिशाली वादळांपैकी एक मानल्या जाणार्‍या मेरांती वादळाने चीनच्या फुजियान प्रांताला मोठी हानी पोेचवली. शियामेन शहरातील शियानगानमध्ये आलेले हे वादळ दक्षिण फुजियान प्रांतात १९४९ नंतर आलेले सर्वात शक्तिशाली वादळ आहे. यामुळे परिसरातील पाणी आणि वीज पुरवठा पूर्णत: ठप्प पडला असून वेगवान हवा आणि पाऊस यांनी थैमान घातले आहे, अशी माहिती शिन्हुआ या शासकीय वृत्तसंस्थेने दिली आहे. चीनच्या पूर्व फुजान प्रांतातील झियामेन भागाला २३० कि.मी. वेग असलेल्या वादळाने धडक दिल्यानंतर अनेक घरे जमीनदोस्त झाली.

तैवानलाही मेरांंती चक्रीवादळाने तडाखा दिला. या वादळामुळे काओसुईंग भागातील शिझिवान येथे मासेमारीवर निघालेली बोट उलटली.

महर्षींनी प्रलयकालाविषयी सतर्क करणे

१९.३.२०१६ या दिवशी झालेल्या नाडीवाचन क्रमांक ६७मध्ये महर्षि म्हणतात, हे पूर्ण वर्ष प्रलयकालाचे आणि आपत्तीजनक असणारे आहे. (सर्वाधिक शक्तिशाली वादळांपैकी एक मानल्या जाणार्‍या मेरांती वादळाने चीनच्या फुजियान प्रांताला मोठी हानी पोेचवली. या घटनेवरून प्रलयकालाविषयी महर्षींनी केलेले भाष्य किती तंतोतंत आहे, हे लक्षात येते ! – संपादक)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात