अंबरनाथ नगरपालिकेमध्ये गणेशोत्सवात सनातनचे फ्लेक्स प्रदर्शन

नगरपालिकेमध्ये फ्लेक्सचे प्रदर्शन

अंबरनाथ – अंबरनाथ नगरपालिका गणेशोत्सव मंडळाच्या वतीने सकाळी १० वाजता कु. प्रज्ञा बनसोडे यांच्या हस्ते श्रीगणेशाच्या मूर्तीची स्थापना झाली. त्याच दालनामध्ये गणेशपूजा आणि धार्मिक विधी यांसंदर्भातील सनातन संस्थेचे फ्लेक्सचे प्रदर्शन मंडळाच्या सहमतीने लावण्यात आले.

ambarnath-nagar-palika-pradarshan-3

नगरपालिका गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष श्री. आर्.बी. पाटील, श्री. सुहास सावंत, भजनी मंडळाचे श्री. गोरख मुकादम आणि येथील अन्य कर्मचारी म्हणाले, आपण नंतर येऊन आरती कशी करावी या संदर्भातील शास्त्र आरतीच्या वेळी येऊन सर्वांना सांगावे. तसेच त्या ठिकाणी उपस्थित सेवानिवृत्त श्री. विनायक पाटील श्री साईबाबा सेवा मंडळाच्या अध्यक्षांनी सांगितले की, आमच्या मंडळात गुरुवारी संध्याकाळी आरतीला येऊन उपस्थितांना या संदर्भात धार्मिक शिक्षण द्यावे.