मिरज येथे गणेशोत्सवानिमित्त सनातन संस्थेचे ग्रंथप्रदर्शन !

मिरज, ११ सप्टेंबर (वार्ता.) – मंगळवार पेठेतील भोसले चौक येथे हनुमान गणेशोत्सव मंडळासमोर सनातन संस्थेच्या वतीने लावण्यात आलेल्या ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन १० सप्टेंबर या दिवशी माजी नगरसेवक श्री. प्रसाद मदभावीकर यांच्या हस्ते नारळ वाढवून आणि दीपप्रज्वलन करून करण्यात आले. या वेळी डॉ. भालचंद्र साठे आणि श्री. इसापुरे, तसेच सनातन संस्थेच्या डॉ. (सौ.) शरदिनी कोरे उपस्थित होत्या. हे प्रदर्शन १५ सप्टेंबरअखेर चालू रहाणार असून भाविकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सनातन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.