धर्मशास्त्र जाणून घेऊन सण साजरे करूया ! – सौ. नयना भगत

Devnar-photo_Sou.-Bhagat
मार्गदर्शनाचा लाभ घेतांना उपस्थित महिला

मुंबई : आपल्या सर्व सणांच्या मागे धर्मशास्त्र आहे. धर्मशास्त्र जाणून घेऊन कृती केली तर आपल्याला त्याचा अधिकाधिक आध्यात्मिक लाभ होईल. त्यामुळे धर्मशास्त्र जाणून घेऊन सण साजरे करूया, असे आवाहन सनातन संस्थेच्या प्रवक्त्या सौ. नयना भगत यांनी केले. देवनार येथील मातोश्री विद्यामंदिरात ६ ऑगस्ट या दिवशी माता पालक संघाच्या प्रथम बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी उपस्थित महिलांना नागपंचमीचे महत्त्व या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. मार्गदर्शनातून सण आणि उत्सव यांमागील शास्त्र, चातुर्मासाचे महत्त्व, गुरुशिष्य परंपरा आदी विषयांवर त्यांनी माहिती दिली. मातोश्री विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका सौ. उज्ज्वला सांडभोर यांनी पुढाकार घेऊन या कार्यक्रमाचे आयोजन केले. कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून शाळेच्या अध्यक्षा श्रीमती करुणाताई पाटील उपस्थित होत्या. ७० हून अधिक महिलांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात