धारा खाद्यतेलाच्या विज्ञापनातून श्री गणेशाचे विडंबन

हिंदूंकडून वारंवार होणारे देवतांचे
विडंबन रोखण्यासाठी धर्मशिक्षण देणे अपरिहार्य आहे !

Dhara_Vitamban
धारा खाद्यतेलाच्या विज्ञापनात शेंगदाण्यांनी श्री गणेशाचे चित्र

मुंबई – धारा फिल्टर्ड ग्राऊण्डनट ऑईल या खाद्यतेलाच्या विज्ञापनामध्ये या गणेशचतुर्थीला, गणपतीला द्या एक हेल्दी ट्रीट, असा उल्लेख करून शेंगदाण्यांनी श्री गणेशाचे चित्र साकारण्यात आले आहे. ठाणे महानगरपालिका परिवहन मंडळाच्या बसगाड्यांवरही अशा प्रकारची विज्ञापने देण्यात आली आहेत. (श्रीगणेशाला विटंबनात्मक रूपात दाखवून उत्पादनाचे विज्ञापन करणार्‍या आस्थापनावर कधीतरी श्रीगणेशाची कृपा होईल का ? अन्य धर्मीय स्वत:च्या श्रद्धास्थानांचे असे विटंबन कधीतरी खपवून घेतील का ? – संपादक)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात