सनातन संस्थेच्या ग्रंथ प्रदर्शनास भाविकांचा अभूतपूर्व प्रतिसाद !

कन्यागत महापर्व विशेष

  • २ दिवसांत १० सहस्र भाविकांची प्रदर्शनाला भेट !
  • रात्री १० नंतरही प्रदर्शन पहाण्यासाठी भाविकांची गर्दी !
  • प्रदर्शन वारंवार भरवण्याची भाविकांची मागणी !
1
पालखीतील श्री दत्तात्रेयांची उत्सवमूर्ती

नृसिंहवाडी : येथील कमानीशेजारी असलेल्या श्री दत्तविद्यामंदिर येथे लावण्यात आलेल्या सनातन संस्थेच्या ग्रंथ, सात्त्विक उत्पादने, फ्लेक्स प्रदर्शनास भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी २ सहस्रांपेक्षा अधिक भाविकांनी प्रदर्शनाचा लाभ घेतला. रात्री १० नंतरही प्रदर्शन पहाण्यासाठी भाविकांची गर्दी होत होती. प्रदर्शन पहाण्यासाठी पोलीस, प्रशासन, नागरिक, पुजारी, तरुण, महिला अशा प्रकारे सर्व स्तरांतील लोक आले होते.

2
सनातन संस्थेच्या प्रदर्शन कक्षाचे प्रवेशद्वार
3
पालखी मिरवणुकीसाठी काढलेली आकर्षक रांगोळी आणि पालखीच्या मार्गावर पसरलेल्या फुलांच्या पाकळ्या

विशेष

११ ऑगस्ट या दिवशी दोन पोलीस प्रदर्शन पाहून गेले. १२ ऑगस्ट या दिवशी ते सकाळी प्रदर्शनस्थळी आले आणि त्यांनी साधकांकडून कपाळाला नाम लावून घेतले. (सनातन संस्था हिंदु धर्मप्रसाराचे योग्य कार्य करत असून हिंदूंना धर्मशिक्षण देत आहे. ही गोष्ट पोलीस दलातील काही चांगल्या पोलिसांनाही लक्षात येते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

‘लव्ह जिहाद’चा विशेषांक वाचून भयावहता लक्षात आली !

प्रदर्शनस्थळी ‘लव्ह जिहाद’ची माहिती देणारा दैनिक सनातन प्रभातचा विशेषांक विक्रीसाठी ठेवण्यात आला होता. तो पाहून ‘लव्ह जिहाद’ची भयावता लक्षात आली, असे अनेकांनी सांगितले.

सामाजिक संकेतस्थळाच्या कक्षास तरुणांचा भरघोस प्रतिसाद !

5
प्रदर्शनाचा लाभ घेतांना जिज्ञासू
7
संकेतस्थळाविषयी जाणून घेतांना जिज्ञासू, तसेच प्रदर्शन पहातांना अन्य भाविक

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सामाजिक संकेस्थळ कक्ष उभारण्यात आला. त्याला युवकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. अनेक तरुणांनी सामाजिक संकेस्थळाच्या माध्यमातून आम्ही हिंदु धर्माचा प्रसार करू शकतो, असे सांगितले.

4
प्रदर्शन पाहून अभिप्राय नोंदवतांना भाविक

प्रदर्शन पाहिलेल्या भाविकांचे कौतुकोद्गार

6
फ्लेक्स फलकांविषयी जाणून घेतांना धर्माभिमानी

१. श्री क्षेत्र सोनारी (ता. परांडा, जि. धाराशिव) येथील देवस्थानचे मुख्य पुजारी श्री. संजय चंद्रकांत पुजारी आणि त्यांचे सहकारी-भक्तगण यांनी प्रदर्शनास भेट दिली. श्री. पुजारी यांनी ते विविध माध्यमांतून सनातनच्या कार्यात सहभागी असल्याचे सांगितले. त्यांचे एक सहकारी श्री. समीर पुजारी यांनी सांगितले, ‘हिंदु धर्माविषयी सनातन संस्था करत असलेले प्रयत्न पाहून समाधान वाटले’.

२. प्रा. रमेश नारखेडकर, कुरुंदवाड : मी इको फ्रेंडली श्री गणेशमूर्ती तयार करणार होतो; मात्र प्रदर्शन पाहून असे करणे अयोग्य आहे, ही जाणीव झाली. त्यामुळे मी इको फ्रेंडली गणेशमूर्ती बनवण्याची संकल्पना रहित करत आहे. आजपर्यंत मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी निगडित काम करत होतो, तेही चुकीचे असल्याची मला जाणीव झाली. देवतांची मूर्ती ही त्या त्या तत्त्वानुसारच करायला हवी, हेही समजले.

३. श्री. सदानंद कुलकर्णी, शिरवाड : हे प्रदर्शन म्हणजे ज्ञानामृत आहे. ज्ञानामृत सर्वांनी प्राशन केल्यास जीवनाचे सार्थक होईल.

४. श्री. विजय कडाळे, कुरुंदवाड : हे प्रदर्शन सर्वांनाच उपयुक्त आहे. हे प्रदर्शन वारंवार भरवावे.

५. श्री. सर्जेराव पाटील, गल्लेवाडी, राधानगरी : हिंदु धर्म टिकावा यांसाठी आपले प्रयत्न स्तुत्य आहेत.

६. सौ. जयश्री विद्याधर शुक्ल, कुरुंदवाड : या प्रदर्शनातील देवघराची मांडणी, नामपट्ट्यांमुळे वास्तूत होणारे लाभ, तसेच राहणीमान यांत पालट करण्याचा प्रयत्न करू. ग्रंथांतील माहितीमुळे दैनंदिन जीवनातही लाभ होईल.

७. श्री. किरण चौगुले, नांदणी : सनातन संस्था आताच्या पिढीसाठी चांगले कार्य करत आहे. या कार्यासाठी तुम्हाला जे सहकार्य लागेल, ते आम्ही करू ! आम्ही सर्व मिळून हिंदु राष्ट्र निर्माण करू. तुमच्या संघटनेत कार्य करण्याची इच्छा आहे.

८. श्री. धनंजय लोहार, कोल्हापूर : हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यात आम्ही अवश्य सहभाग नोंदवू. असा सहभाग नोंदवणे आमच्यासाठी अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट राहील !

प्रदर्शन पाहिल्यावर पोलिसांनी दिलेले अभिप्राय

१. दिगंबर धोंडिबा गायकवाड, बाभळगाव : प्रत्येक १२ वर्षांनी भरणार्‍या कन्यागत पर्वाच्या ठिकाणी सनातन संस्थेचे प्रदर्शन अतिशय चांगले आहे. ज्ञानाचे भांडार आम्हाला या ठिकाणी पहावयास मिळाले. ही माझ्यासाठी मोठी शिदोरीच आहे.

२. अभिनंदन खाटकी, उमळवाड : आजपर्यंत आम्ही चुकीच्या पद्धतीने देवतांना नमस्कार करत होतो. ही अयोग्य कृती आम्ही सुधारू. देवाची पूजा कशी करावी, याचीही सुंदर माहिती मिळाली.

३. पूजा बाबासो पोवार, अंबप : सदरचे प्रदर्शन आजच्या पिढीच्या तरुण-तरुणींना हिंदु धर्म आणि देव यांचे महत्त्व पटवून देणारे आहे.

४. श्री. माणिकराव सदाशिव पाटील, रेवाळ : सनातन संस्थेचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. या कार्याचे मी मनापासून आभार मानतो

 संदर्भ : दैनिक सनातन प्रभात