हिंदुत्वनिष्ठांनी साधना केल्यास त्यांना निश्‍चित यश येईल ! – पू. नंदकुमार जाधव

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भुसावळ येथे तालुकास्तरीय अधिवेशन ! 

 

taluka_adhiveshan
डावीकडून कु. रागेश्री देशपांडे, पू. नंदकुमार जाधव, दीपप्रज्वलन करतांना ह.भ.प. सुभाष महाराज पाटील आणि श्री. प्रशांत जुवेकर

जळगाव हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात सहभागी होण्यासाठी हिंदुत्वनिष्ठांनी नियमित साधना करणे आवश्यक आहे. त्यामुळे ईश्‍वराचे आशीर्वाद प्राप्त होऊन त्यांना त्यांच्या कार्यात निश्‍चित यश येईल, असे मार्गदर्शन सनातनचे पू. नंदकुमार जाधव यांनी केले. ते भुसावळ येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय हिंदू अधिवेशनात बोलत होते. या अधिवेशनाचा आरंभ दीपप्रज्वलनाने करण्यात आला. या अधिवेशनात भुसावळ, रावेर आणि यावल या तालुक्यांतील विविध गावांतील धर्माभिमान्यांनी सहभाग घेतला.

अधिवेशनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात पू. नंदकुमार जाधव यांच्यासह निंभोरा, तालुका रावेर येथील ह.भ.प. सुभाष महाराज पाटील, रणरागिणी शाखेच्या कु. रागेश्री देशपांडे आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रशांत जुवेकर यांनी हिंदुत्वनिष्ठांना संबोधित केले.

धर्माभिमान्यांना धर्मकार्य करतांना येणार्‍या कायदेशीर अडचणींविषयी संभाजीनगर येथील अधिवक्ता श्री. सुरेश कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले.

गोजोरा येथील ह.भ.प. गणेशमहाराज दोडे यांनी गोरक्षणाच्या संदर्भात उपस्थितांना मार्गदर्शन केले. धर्माभिमानी श्री. पियुष महाजन, श्री. अभय राठोड यांनी लव्ह जिहादसंबंधी त्यांचे अनुभव मांडले, तर श्री. स्वप्नील पवार यांनी दंगलीविषयी त्यांना आलेला अनुभव विषद केला. कार्यक्रमाची सांगता वन्दे मातरम् या राष्ट्रीय गीताने करण्यात आली.

 

क्षणचित्रे

१. अधिवेशनात राष्ट्रीय हिंदू आंदोलनाचे प्रात्यक्षिक पाहिल्यावर रावेर आणि यावल या तालुक्यांतही असे राष्ट्रीय हिंदू आंदोलनाचे आयोजन करू शकतो, अशी सिद्धता धर्माभिमान्यांनी दर्शवली.

२. या अधिवेशनासाठी भुसावळ शहराचे उपनगराध्यक्ष श्री. युवराज लोणारी यांनी त्यांचे सभागृह विनामूल्य उपलब्ध करून दिले.

३. अधिवेशनात घेण्यात आलेल्या गटचर्चेच्या वेळी धर्माभिमान्यांनी आदर्श गणेशोत्सव मोहिमेत सहभागी होण्यास उत्साह दर्शवला.

४. आदर्श गणेशोत्सवाच्या संदर्भात अधिवेशनात दाखवण्यात आलेल्या ध्वनीचित्रचकतीची अनेक धर्माभिमान्यांनी मागणी केली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात