बलात्कार करणार्‍यांना कठोरात कठोर शासन द्या !

कराड येथे नायब तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी
photo-copy

कराड : कोपर्डी जिल्हा नगर, तसेच तडवळे (जिल्हा सातारा) येथे झालेली बलात्काराची घटना यांतील दोषींना कठोरात कठोर शासन द्यावे, या मागणीचे निवेदन वनवासमाची (सज्जनगड) येथील धर्माभिमान्यांनी मुख्यमंत्र्यांच्या नावे कराड नायब तहसीलदार मीनल भामरे यांना दिले. या वेळी श्री शिवप्रतिष्ठानचे सर्वश्री सचिन कुंभार, संदीप माने, श्री. अमोल कुंभार, नवजवान गणेश मंडळ, वनवासमाचीचे श्री. आनंदराव जाधव, श्री. अशोक माने, तसेच धर्माभिमानी सर्वश्री शहाजी जाधव, अक्षय सावंत, सागर खोचरे, सोमनाथ नाळे, सुशांत शिंदे, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि सनातन संस्थेचे साधक उपस्थित होते.

वाढत्या बलात्काराच्या घटना घडत असतांना शासन काय करत आहे ? ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी रांझाच्या पाटलाचा चौरंगा केला, त्याचप्रमाणे या नराधमांना शिक्षा द्यावी. तसे झाल्यासच अशा घटनांना आळा बसेल, असेही या निवेदनात म्हटले आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात