हिंदु धर्मातील सण, व्रते यांमागील शास्त्र समजावून घेऊन कृती केल्यास धर्माचरणाचा आनंद मिळेल ! – सौ. अनुराधा निकम

कन्यागत पर्वाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने
नृसिंहवाडी परिसरात विविध माध्यमातून धर्मप्रसार !

anuradha_nikam
सौ. अनुराधा निकम यांच्या प्रवचनास उपस्थित महिला

शिरढोण-कुरुंदवाड (जिल्हा कोल्हापूर) : हिंदु धर्मात साजर्‍या करण्यात येणार्‍या प्रत्येक सण, व्रते यांमागे अध्यात्मशास्त्र आहे. महिलांच्या आभूषणांमुळे धर्माचरणासमवेत आपले रक्षणही होते. त्यामुळे प्रत्येक सण, व्रते यांमागील शास्त्र समजून घेऊन कृती केल्यास धर्माचरणाचा आनंद मिळेल, असे प्रतिपादन पुणे येथील ज्ञानेश प्रायमरी स्कूलच्या संचालिका सौ. अनुराधा निकम यांनी केले. त्या १४ ऑगस्ट या दिवशी कल्लेश्‍वर देवालय येथे आयोजित प्रवचनात बोलत होत्या. याचा लाभ ५० हून अधिक भाविकांनी घेतला.

क्षणचित्रे

१. या ठिकाणी श्री. महादेव शंकर पाणदरे यांचे श्रावण मासात नियमित प्रवचन होते. त्यांनी स्वत:च्या प्रवचनाच्या वेळेत सनातन संस्थेला विषय मांडण्यासाठी वेळ उपलब्ध करून दिला. (स्वत:च्या प्रवचनाच्या वेळेत सनातन संस्थेला विषय मांडण्यासाठी वेळ उपलब्ध करून देऊन श्री. पाणदरे यांनी इतरांसमोर आदर्शच ठेवला आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

२. आभार प्रदर्शनाच्या वेळी हिंदु धर्माभिमानी डॉ. कुमार सनातन संस्थेविषयी गौरवोद्गार काढतांना म्हणाले, पाश्‍चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण रोेखण्यासाठी सनातन संस्था प्रयत्नशील आहे, हे कौतुकास्पद आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही सनातन संस्थेवर आरोप होऊनही संस्था धर्मप्रसाराचे कार्य जोमाने आणि अव्याहतपणे करत आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात