सनातन संस्था, तसेच हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने विविध जिल्ह्यांत हिंदुत्ववादी, प्रशासकीय अधिकारी, संपादक, तसेच धर्माभिमानी यांना रक्षाबंधन !

हिंदु राष्ट्रासाठी प्रत्येकाचेच योगदान असावे, तसेच महान भारतीय संस्कृतीची जोपासना व्हावी, या उद्देशाने सनातन संस्था तसेच हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, सांगली, पंढरपूर, लातूर आदी जिल्ह्यांत विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, तसेच विविध प्रशासकीय अधिकारी यांना राखी बांधण्यात आली. बहुतांश सर्वांनीच समितीच्या कार्याची प्रशंसा करून “तुम्ही हाक माराल तेव्हा आम्ही या राष्ट्रकार्यासाठी सहकार्य करू”, असे सांगितले.

1
निवासी उपजिल्हाधिकारी श्री. त्रिगुण कुलकर्णी (उजवीकडे) यांना राखी बांधतांना सौ. मधुरा तोफखाने

सांगली : मिरज येथील भाजप सोशल मिडियाचे श्री. अजिंक्य हंबर, शिवसेना उद्योग समूहाचे श्री. अजित दाणेकर, मिरज शहर पोलीस निरीक्षक श्री. सदाशिव शेलार, धनगर समाज आणि शिवसेनेचे श्री. महादेव हुलवान, शिवसेनेचे सर्वश्री विशालसिंह राजपूत, किरणसिंह राजपूत, युवासेनेचे श्री. कुबेर राजपूत, श्रीशिवप्रतिष्ठानचे श्री. स्वप्नील कत्तीरे, भाजप मिरज शहर सरचिटणीस श्री. चैतन्य भोकरे यांना राखी बांधण्यात आली. सांगली येथे निवासी उपजिल्हाधिकारी श्री. त्रिगुण कुलकर्णी, नायब तहसीलदार श्री. दोरकर, सांगली-मिरज आणि कुपवाड महापालिका उपायुक्त श्री. सुनील पवार, उपमहापौर श्री. विजय घाडगे, शहर पोलीस ठाण्यात पोलीस अधिकारी श्री. चौधरी, तर पलूस येथे महसूल नायब तहसीलदार श्री. नारायण मोरे यांना राखी बांधण्यात आली.

2
शहर पोलीस ठाण्याचे नुतन पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे यांना राखी बांधतांना सौ. अनिता बुणगे

पंढरपूर : येथे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने भाजपचे आमदार प्रशांत परिचारक, पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे यांसह तहसीलदार नागेश पाटील यांना राखी बांधण्यात आली.

3
गांधी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांना राखी बांधतांना सौ. अरुणा कुलकर्णी

लातूर : येथे सनातन संस्थेच्या वतीने गांधी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे आणि शिवाजी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण उबाळे यांना राखी बांधण्यात आली.

4
‘ठाणे वैभव’चे संपादक श्री. मिलिंद बल्लाळ यांना प्रसाद देतांना सौ. सीमा कापडी

ठाणे : अंबरनाथ (जिल्हा ठाणे) येथील शिवाजीनगर पोलीस स्थानक येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. दिलीप गोडबोले आणि गोपनीय अधिकारी श्री. नवनाथ लोकरे यांना समितीच्या अधिवक्ता सौ. किशोरी कुलकर्णी यांनी राखी बांधली. ‘डेली न्यूज अंबरनाथ’चे श्री. नसीर शेख आणि ‘उल्हास विकासचे’चे श्री. युसुफ शेख यांनी समितीच्या अधिवक्ता सौ. किशोरी कुलकर्णी यांची मुलाखात घेऊन रक्षबंधनाच्या संदर्भातील माहिती जाणून घेतली. ठाणे येथील दैनिक ‘ठाणे वैभव’चे संपादक श्री. मिलिंद बल्लाळ यांना समितीच्या वतीने राखी बांधण्यात आली.

5
गोपनीय अधिकारी श्री. नवनाथ लोकरे यांना राखी बांधताना समितीच्या अधिवक्त्या सौ. किशोरी कुलकर्णी
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात