सनातनच्या साधिका प्रतिभा तावरे यांनी प्रबोधन करून प्लास्टिकच्या ध्वजाची विक्री रोखली !

 राष्ट्रहानी रोखणार्‍या सनातनच्या साधिका हीच हिंदु धर्माची खरी शक्ती !    

जयसिंगपूर : येथे १५ ऑगस्टच्या निमित्ताने सिद्धेश्‍वर देवालय येथे श्रावणी सोमवारच्या निमित्ताने सनातन संस्थेचे ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते. त्या वेळी तेथे फिरत्या विक्रेत्याकडे प्लास्टिकचे राष्ट्रध्वज, तसेच ध्वजासाख्या दिसणार्‍या टोप्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. सनातनच्या साधिका कु. प्रतिभा तावरे यांच्या लक्षात हे आल्यावर त्यांनी विक्रेत्याचे प्रबोधन केले. प्रबोधनानंतर विक्रेत्याने या वस्तूंची विक्री न करता त्या पिशवीत ठेवून दिल्या.

नंदुरबार येथे सनातन संस्था ठाणे न्यासाच्या वतीने प्रबोधनात्मक उपक्रम

Nandurbar_upakram
मार्गदर्शनाचा लाभ घेतांना विद्यार्थी

नंदुरबार : राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी सनातन संस्था ठाणे न्यासाच्या वतीने येथील महिला महाविद्यालयात प्रबोधनात्मक उपक्रम घेण्यात आला. या वेळी डॉ. नरेंद्र पाटील यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या वेळी मुख्याध्यापक रुपेश चौधरी आणि शिक्षक उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात