स्वागत कमानी, होर्डिंग यांद्वारे सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून व्यापक धर्मप्रसार !

1
ग्रंथ आणि धर्मशिक्षण फलक यांच्या प्रदर्शनाची कमान
2
धर्मशिक्षण देणारा फलक

नृसिंहवाडी (जिल्हा कोल्हापूर) : नृसिंहवाडी येथे १२ ऑगस्टपासून चालू होणार्‍या कन्यागत महापर्वाच्या निमित्ताने सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने व्यापक अध्यात्मप्रसार, धर्मप्रसार करण्यात येणार आहे. या महापर्वाची लोकांना माहिती होण्यासाठी विविध ठिकाणी फलक, स्वागतकमानी लावण्यात येत आहेत. अध्यात्मशास्त्राची माहिती देण्यासाठी सनातन संस्थेचा विशेष धर्मरथही नृसिंहवाडी येथे आला आहे. याचसमवेत अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीनेही पर्वाच्या निमित्ताने विशेष संशोधन करण्यात येणार आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात