वर्धा येथे राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासंदर्भात प्रशासनाला निवेदन सादर !

nivedan
पोलीस अधीक्षकांना निवेदन देताना कार्यकर्ते

वर्धा : येथे राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासंदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी श्री. वैभव नावडकर, पोलीस अधीक्षक श्री. अंकित गोयल, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यपालन अधिकारी श्री. विवेक इलमे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. शशिकांत पाध्ये, श्री. रमेश चिमुरकर, सौ. भक्ती चौधरी, कु. श्‍वेता जमनारे तसेच सनातन संस्थेच्या सौ. वनिता किरसान, सौ. रजनी थोटे उपस्थित होत्या.

या वेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यपालन अधिकारी श्री. विवेक इलमे यांनी,’हा उपक्रम स्तुत्य असून आमचे तुम्हाला सहकार्य राहील. हे खरे तर आमचेच कार्य आहे’, अशा शब्दांत या कार्याला पाठिंबा दिला. पोलीस अधीक्षक श्री अंकित गोयल यांनी ‘१०० या क्रमांकावर दूरध्वनी केल्यास तुम्हाला सहकार्य करू’ असे आश्‍वासन दिले. निवासी उपजिल्हाधिकारी श्री. वैभव नावडकर यांनी, ‘भिवंडी आणि जळगांव येथे स्थापन झालेल्या कृती समितीची प्रत आम्हाला दिली तर आम्ही येथेही कृती समिती स्थापन करू शकतो’, असे यावेळी सांगितले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात