जोधपूर (राजस्थान) येथे पार पडलेल्या अखिल भारतवर्षीय माहेश्‍वरी महासभेच्या बैठकीत सनातन संस्थेच्या वतीने अध्यात्मप्रसार !

aheshwari_Sabha_Dnk_1
ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांच्या प्रदर्शनाचा लाभ घेतांना जिज्ञासू

जोधपूर : येथील कस्तूरी ऑर्चिड येथे अखिल भारतवर्षीय माहेश्‍वरी महासभेच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत सनातन संस्थेच्या वतीने अध्यात्मप्रसार करण्यात आला. या ठिकाणी धर्म, अध्यात्म, देवता यांसारख्या विविध विषयांवरील सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. याशिवाय देवळात दर्शन कसे घ्यावे ?, कुलदेवता आणि दत्त यांच्या नामजपाचे महत्त्व, पाश्‍चात्त्य संस्कृती टाळून हिंदु संस्कृतीनुसार आचरण करा, आदी विषयांवरील फलकांचे प्रदर्शनही लावण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी देश-विदेशातून आलेल्या ५०० हून अधिक जणांनी संस्थेच्या प्रदर्शनाला भेट दिली. अनेकांनी सनातनचे सर्वच ग्रंथ घेण्यासारखे आहेत, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली, तर काहीजण पाक्षिक सनातन प्रभातचे वर्गणीदार झाले. या प्रदर्शनाच्या आयोजनासाठी श्री. संदीपजी काबरा यांचे सहकार्य लाभले.

अखिल भारतवर्षीय माहेश्‍वरी महासभेच्या महिला अध्यक्षांशी लव्ह जिहादविषयी चर्चा !

या वेळी सनातन संस्थेच्या डॉ. (सौ.) स्वाती मोदी यांनी अखिल भारतवर्षीय माहेश्‍वरी महासभेच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा सौ. सुशीला काबरा यांची भेट घेतली. या वेळी डॉ. (सौ.) स्वाती मोदी यांनी सौ. काबरा यांना लव्ह जिहादविषयी माहिती देऊन त्याविषयी हिंदु जनजागृती समितीने प्रकाशित केलेला ग्रंथही त्यांना दाखवला. याशिवाय माहेश्‍वरी समाजातील युवतींमध्ये लव्ह जिहादच्या षड्यंत्राची माहिती पोचण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची विनंतीही केली. सौ. काबरा यांनी यासाठी सकारात्मक प्रतिसाद देत कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे आश्‍वासन दिले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात