कर्नाटकमध्ये प्लास्टर ऑफ पॅरिस आणि रासायनिक रंग दिलेल्या श्रीगणेशमूर्तींवर बंदी !

कर्नाटक राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचा स्तुत्य निर्णय !

असा निर्णय देशातील सर्व राज्यांनी घ्यावा !

pollution-control-board-karnataka-300x259बेंगळुरू (कर्नाटक) : कर्नाटक राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्लास्टर ऑफ पॅरिस आणि रासायनिक रंग दिलेल्या श्रीगणेशमूर्तींवर बंदी घातली आहे. त्याऐवजी मातीच्या श्रीगणेशमूर्ती बनवल्या जाणार आहेत. कर्नाटकमधील वॉटर अ‍ॅक्ट १९७४नुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या वर्षीच हा निर्णय झाला होता; परंतु त्याची कार्यवाही करता आली नव्हती. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्रीगणेशमूर्तींची विक्री करणार्‍या व्यापार्‍यांची अनुज्ञप्ती (लायसन्स) रहित के जाणार आहे. यासाठी पोलिसांचे सहकार्य घेतले जाणार आहे. राज्याबाहेरून येणार्‍या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्रीगणेशमूर्तींवरही बंदी घातली जाणार आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात