सनातन संस्था कोल्हापूर न्यासाच्या वतीने वृक्षारोपण !

IMG_1207_Sपुणे, १५ जुलै – गोर्‍हे बुद्रुक येथे १० जुलै या दिवशी सामाजिक वनीकरणाचा उपक्रम राबवण्यात आला. गोर्‍हे गावचे सरपंच श्री. सचिन पासलकर, ग्रामपंचायत सदस्य श्री. खिरीड आणि श्री. संदेश तिपुळे यांच्या हस्ते गावात वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी भेंडीवृक्ष आणि चिंच अशा २२ वृक्षांची लागवड करण्यात आली. या वेळी संस्थेचे श्री. विनायक बागवडे आणि श्री. राजेंद्र कुटे आदी उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात