सनातन संस्था सातारा न्यासाच्या वतीने देवद (पनवेल) येथे वृक्षारोपण

पनवेल – गेली काही वर्षे पृथ्वीच्या तापमानात वाढ होत आहे, तर पर्जन्यमान न्यून होत आहे. त्यामुळे आपल्यासमोर अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. अमर्याद वृक्षतोडही त्यास कारणीभूत आहे. प्रत्येक व्यक्तीने प्रतिवर्षी एक झाड लावून त्याचे संगोपन केले, तर या समस्या दूर होतील असे मत देवद ग्रामपंचायतचे सदस्य श्री. निनाद गाडगीळ यांनी व्यक्त केले. सनातन संस्था सातारा या न्यासाच्या वतीने देवद गाव, पनवेल येथील सनातन संकुल येथे श्री. निनाद गाडगीळ यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी सनातन संकुल येथील रहिवासी उपस्थित होते.

सनातन आश्रमातील साधक श्री. शंकर नरूटे यांनी, तसेच संकुलातील रहिवासी श्री. प्रमोद बेंद्रे यांनी वृक्षारोपण कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले. सर्वांनी लावलेल्या झाडांचे संगोपन करण्याचा संकल्पही केला.