उत्तराखंडमध्ये ढगफुटी ८ ठार, ३० बेपत्ता

अलकनंदा, शरयू आणि गोमती नद्यांना पूर

    डेहराडून – उत्तराखंडच्या वरच्या भागात मुसळधार पाऊस आणि ढगफुटी यांमुळे मोठ्या प्रमाणात हानी झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. चमोली येथे ढगफुटीमुळे ८ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर पिथौरागड येथे अनेक नागरिक ढिगार्‍याखाली दबले गेले आहेत. ३० हून अधिक लोक बेपत्ता असल्याचेही सांगण्यात येत आहे. नद्यांवर बांधण्यात आलेले तात्पुरते पूल वाहून गेले आहेत. बचावकार्य चालू आहे. अधिकृत माहितीनुसार मुसळधार पावसामुळे अलकनंदा नदी, बागेश्‍वरमध्ये शरयू आणि गोमती या नद्यांनी धोक्याची मर्यादा ओलांडली असून त्यांना पूर आले आहेत. ग्रामीण भागाशी संपर्क तुटला आहे. भूस्खलन झाल्यामुळे बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्ग बंद झाला आहे. त्यामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात