पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात सहभागी झालेल्यांना त्यांच्या उद्दिष्टपूर्तीच्या संदर्भात महर्षींचे आश्‍वस्त करणारे बोल !

महर्षींची शिकवण आणि कार्य !

RS30198_AVV-Icon2नाडीशास्त्रात आम्ही जे रामराज्याच्या
संदर्भात लिहिले आहे, ते खरे होणारच आहे,
असा विश्‍वास महर्षींनी साधकांना उदाहरणातून देणे

     रामराज्य आणि साधकांचे रक्षण यासंदर्भात आम्ही जे लिहिले आहे, ते होणारच आहे; कारण आम्ही सप्तर्षि म्हणजे शंकरच. आम्ही जेव्हा हे सर्व लिहिले, तेव्हा सर्व देवता त्यांच्या परिवारासोबत येथे उपस्थित होत्या. त्या वेळी आम्ही आमच्या भावाश्रूंनी देवांचे चरण धुतले आहेत, तर देव तुमच्यासाठी आम्ही लिहिले आहे, ते नाही का करणार ?

१९.६.२०१६ या दिवशी सुरू होणार्‍या
हिंदू अधिवेशनाविषयी महर्षींचे भाष्य

अ. महर्षींनी हिंदु अधिवेशनासाठी जमलेल्या
सर्वांना अधिवेशन चांगलेच होणार !, असा आशीर्वाद देणे

Anjali_Gadgil
पू. (सौ.) अंजली गाडगीळ

   तुम्ही तेथे (पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात) आता काहीतरी अध्यात्म आणि राष्ट्र एकत्रित येऊन मोठा उत्सव साजरा करत आहात. (यातून महर्षींना म्हणायचे आहे की, हिंदु अधिवेशनाच्या निमित्ताने अध्यात्म जगणारे साधक आणि विविध प्रांतातून आलेले राष्ट्रप्रेमी रामनाथीच्या भूमीत एकत्र जमले आहेत. – सौ. गाडगीळ) हे सर्व ठीक व्हावे आणि सर्व जण सुखरूप घरी जावेत, असे तुम्हालाही (साधकांना) वाटते ना ? हे सर्व जण देवासाठी एकत्र जमत आहेत, तर त्यांना कशाची आली आहे चिंता. सर्व ठीक होणार आहे, असे त्यांना सांगा. हा उत्सव चांगल्या पद्धतीनेच साजरा होणार, यात शंका नाही !
(संदर्भ : सप्तर्षि नाडीपट्टीवाचन क्रमांक ८४, १७.६.२०१६, चेन्नई, तमिळनाडू.)

जगात जे वेदब्राह्मण आहेत,
त्यांनी लवकर उठायला हवे.
बायकांच्या आंबाड्यात फूल असायला हवे.
त्यांचे आचार चांगले असायला हवेत.

      सकाळी उठल्यावर सर्वप्रथम तीन वेळा चूळ भरावी. मग कपाळावर थोडे कुंकू लावावे. मगच तुमच्या वेळेनुसार इतर कामे करावीत. तुम्ही ज्या देवतेची उपासना करता, त्या देवतेचे एक क्षण डोळ्यांवर आणि कानांवर बोटे ठेवून मुद्रा करून स्मरण करावे. (कानांच्या भोकांवर अंगठे आणि बंद डोळ्यांवर इतर बोटे) त्या वेळी त्या देवाचे रूपही तुम्हाला दिसेल.
(संदर्भ : सप्तर्षि नाडीपट्टीवाचन क्रमांक ८४, १७.६.२०१६, चेन्नई, तमिळनाडू.)

(पू.) सौ. अंजली गाडगीळ, तिरुवण्णामलई, तमिळनाडू (१९.६.२०१६, सकाळी १०.४५)