हिंदू अधिवेशनाला साहाय्य करणार्‍या सनातनच्या हितचिंतकांचे मनःपूर्वक आभार !

guruprasad_cuncolienkar
श्री रामनाथ देवस्थानचे सचिव श्री. गुरुप्रसाद कुंकळ्येकर (उजवीकडे) यांचा सत्कार करतांना राजस्थानचे महाराजाधिराज महाराव रघुवीरसिंहजी बहादूर
reshma_talaulikar
गोवा डेअरीच्या वितरण व्यवस्थापक सौ. रेश्मा तळावलीकर (उजवीकडे) यांचा सत्कार करतांना सनातनच्या संत पू. (कु.) अनुराधा वाडेकर
sarish_namshikar
श्री नागेश-महारुद्र देवस्थानचे सचिव श्री. सतीश नमशीकर (उजवीकडे) यांचा सत्कार करतांना राजस्थानचे महाराजाधिराज महाराव रघुवीरसिंहजी बहादूर

अधिवेशनासाठी सभागृह, तसेच हिंदुत्वनिष्ठांच्या निवासासाठी खोल्या उपलब्ध करून देणार्‍या मान्यवरांचा या वेळी सिरोही संस्थान, राजस्थानचे महाराजाधिराज महाराव रघुवीरसिंहजी बहादूर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

१. श्री रामनाथ देवस्थान समितीचे सचिव श्री. गुरुप्रसाद कुंकळ्येकर यांनी अधिवेशनासाठी सभागृह, तसेच निवासी खोल्या उपलब्ध करून दिल्या. हे अधिवेशन त्यांनी सभागृह उपलब्ध करून दिल्यामुळेच होऊ शकले, अशी कृतज्ञता श्री. कुंकळ्येकर यांच्याप्रती व्यक्त करण्यात आली.

पुढील वर्षीचे अधिवेशन अधिक चांगले होण्यासाठी प्रयत्न करू ! – श्री. कुंकळ्येकर   

श्री. कुंकळ्येकर यांनी उत्स्फूर्तपणे मीही एक हिंदूच असून मला या माध्यमातून धर्मकार्याची एक संधी मिळाली. यात मी काही केले नाही. पुढील वर्षीचे अधिवेशन अजून चांगले होण्यासाठी सुधारणा सांगाव्यात. त्यानुसार आम्ही पालट करू, असे नम्र आवाहन केले.                                                    

हिंदु म्हणजे काय, ते सनातनमुळे समाजाला समजत आहे !    

श्री. कुंकळ्येकर पुढे म्हणाले, सनातन संस्थेचे कार्य अतुलनीय असून हिंदु म्हणजे काय ते सनातनमुळे समाजाला समजत आहे. येत्या काळात त्यांचे हिंदु राष्ट्राचे स्वप्न लवकरच साकार होईल. सध्या हिंदु समाज जातींमध्ये विखुरला गेला आहे. संपूर्ण हिंदु समाज एकसंध होणे आवश्यक आहे.

२. नागेशी येथील श्री नागेश-महारूद्र देवस्थान समितीचे सचिव श्री. सतिश नमशीकर यांनी हिंदुत्वनिष्ठांच्या निवासासाठी नागेशी देवस्थानाच्या खोल्या उपलब्ध करून दिल्या. सत्कारानंतर मनोगत व्यक्त करतांना श्री. नमशीकर म्हणाले, मी सर्व प्रतिष्ठित हिंदुत्वनिष्ठांचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी येथे आलो आहे. देवाच्या कृपेने मला श्री नागेशदेवाची सेवा करण्याची संधी मिळाली असून शक्य तेवढे धर्मकार्य करण्याचा प्रयत्न करणार आहे.

३. गेल्या २ वर्षांपासून अधिवेशनस्थळी भोजनासाठी प्रतिदिन ८० लिटर दूध देणार्‍या गोवा डेअरीच्या वितरण व्यवस्थापक सौ. रेश्मा तळावलीकर यांचा या वेळी सनातनच्या संत पू. (कु.) अनुराधा वाडेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. हा सन्मान केवळ माझा नसून गोव्यातील सर्व शेतकर्‍यांचा आहे, असे मनोगत त्यांनी या वेळी व्यक्त केले.     

अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या समारोपाचे हिंदू जनजागृती समितीच्या संकेतस्थळावरून थेट (लाईव्ह) प्रक्षेपण होत होते. त्याचा २० देशांतील ७ सहस्र हिंदूंनी लाभ घेतला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात