पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात हिंदुत्वनिष्ठांनी व्यक्त केलेले मनोगत

नि:स्वार्थीपणे हिंदुत्वरक्षणाचे कार्य करणारी
सनातन  संस्था आणि हिंदु जनजागृती समिती
यांना आमचा  पूर्णपणे पाठिंबा आहे !
– अधिवक्ता निरंजन चौधरी, जळगाव 

niranjan_choudhariसनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती या राजकीय लाभासाठी कार्य करत नसून नि:स्वार्थीपणे हिंदुत्वरक्षणाचे कार्य करत आहेत. आमचा त्यांना पूर्ण पाठिंबा असून यापुढेही असणार आहे. आपण जेव्हा धर्मासाठी कार्य करतो, तेव्हा प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाचे सुदर्शनचक्र कार्यरत रहात असून तेच कार्यासाठी बळ देते. जळगावमध्ये सध्या २५ अधिवक्ता हिंदुत्वासाठी विनामूल्य कार्य करतात. अधिवेशन झाल्यानंतर नाशिक, तसेच मालेगाव येथे जाऊन ही संख्या ७५ पर्यंत नेणार आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या
कृपाशीर्वादामुळे हिंदु राष्ट्र येणारच असल्याची निश्‍चिती वाटते !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपाशीर्वादामुळे कोणत्याही संकटांचे भय वाटत नाही. परात्पर गुरु डॉ. आठवले आणि अन्य संत यांच्या कृपेने सध्या चालू असलेल्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनामुळे हिंदु राष्ट्र येणारच असल्याची खात्री वाटते. हिंदु जनजागृती समिती राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या माध्यमातून जे कार्य करत आहे, त्या कार्याची गेल्या ३-४ वर्षांपासूनच ओळख झाली असती, तर आज आसाममध्ये बांगलादेशी घुसखोरांची संख्या घटली असती.

भारत संपूर्ण विश्‍वाची राजधानी होण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत !

सध्या कलियुग चालू असूनही सनातनच्या गोवा येथील रामनाथी आश्रमात गेल्यानंतर तेथे सत्ययुगाची प्रचीती आली. या आश्रमातून सनातन हिंदु धर्माची नौका धर्मप्रसारासाठी संपूर्ण विश्‍वभरात निघाली आहे. देशद्रोही आणि धर्मद्रोही यांच्याविरुद्ध वैध मार्गाने लढा देत भारत संपूर्ण विश्‍वाची राजधानी होण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत.

साधनेमुळे धर्मरक्षणाचे कार्य देवच करवून घेतो, 
याची अनुभूती येते ! – अधिवक्ता विवेक भावे, कल्याण, मुंबई 

vivek_bhaveसाधनेमुळे धर्मरक्षणाचे कार्य आपण करत नसून प्रत्यक्ष ईश्‍वरच करत आहे, याची अनुभूती घेता येते. सनातनच्या सत्संगात गेल्यामुळे सूक्ष्म-जगताशी ओळख होऊन आपण मन आणि बुद्धी यांच्या स्तरावर करत असलेले कार्य अपूर्ण असल्याची जाणीव झाली, असे मनोगत कल्याण मुंबई येथील अधिवक्ता विवेक भावे यांनी व्यक्त केले.
 

अधिवक्ता विवेक भावे यांना
धर्मरक्षणाच्या कार्यात  मिळालेले देवाचे सहाय्य !

धर्मरक्षणाच्या कार्यात आलेल्या अनुभूतींविषयी सांगताना अधिवक्ता भावे पुढे म्हणाले,
 
१. कल्याण येथे अवैधरित्या गोवंशाची हत्या करून त्याची वाहतूक केल्याच्या प्रकरणी चालक, तसेच याविषयीची तक्रार दाखल करून न घेणार्‍या पोलिसाविरुद्ध राजकारण्यांचा दबाव असूनही केवळ नामजपामुळे खटला दाखल करणे शक्य झाले.
 
२. सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्यावर संमोहित करून गुन्हा करवून घेतल्याचा धादांत खोटा आरोप करणारे श्याम मानव यांना हे आरोप सिद्ध करून दाखवण्याचे उघड आव्हान दिलेे. याविषयी ते काहीच उत्तर देऊन न शकल्याने मानव यांच्या विरोधात खटला दाखल केला. केवळ ईश्‍वराचे साहाय्य असल्यामुळेच हे शक्य झाले.

हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था
यांच्या आध्यात्मिक सामर्थ्यामुळे मध्यप्रदेशातील
धर्मरक्षणाच्या कार्याला गती मिळाली ! – श्री. योगेश
अगरवाल, अध्यक्ष, हिंदु धर्म सेना, जबलपूर, मध्यप्रदेश

yogesh_aggarwalहिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या आध्यात्मिक सामर्थ्यामुळे मध्यप्रदेशातील धर्मरक्षणाच्या कार्याला गती येत असून हिंदु जनजागृती समितीचे श्री. योगेश व्हनमारे आणि श्री. विनय पानवळकर हे आमच्यासाठी देवतेसमान आहेत. त्यांनी सांगितल्याप्रमाणे नामजप आणि प्रार्थना केल्यामुळे ९९ टक्के कार्य होते.

 

पुणे येथील धर्माभिमानी श्री. विजय गावडे
यांचा सनातन संस्थेच्या कार्याप्रती असलेला विश्‍वास ! 

vijay_gaudeपुणे येथील धर्माभिमानी श्री. विजय गावडे हे एका हिंदुत्वनिष्ठ संघटनेत उच्चपदावर कार्य करत होते. सनातन संस्थेवर सध्या होत असलेल्या हत्येच्या आरोपांविषयीची वृत्ते पाहून त्यांच्या संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी गावडे यांना सनातन संस्थेशी संपर्क न ठेवण्यास सांगितले. त्यांचा सनातन संस्था संपूर्णपणे निर्दोष असून ती प्रामाणिकपणे हिंदुत्वाचे कार्य करत आहे, असा दृढ विश्‍वास असल्याने त्यांनी सनातनच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहाणार असल्याचे सांगून त्यांच्या संघटनेतील पदाचे त्यागपत्र दिले. आता श्री. गावडे यांनी पुणे येथे सनातनच्या माध्यमातून पूर्णवेळ हिंदुत्वाचे कार्य आणि साधना करणार असल्याचा निर्धार व्यक्त केला. (धर्मावरील ग्लानी दूर होण्यासाठी वैध मार्गाने कार्य करणार्‍या सनातन संस्थेवर नाहक आरोप करून सनातनद्वेष्टे सनातनला अपकीर्त करू पहात आहेत; मात्र श्री. गावडे यांच्यासारखे धर्माभिमानी सनातनच्या पाठीशी उभे आहेत. अशा धर्माभिमान्यांप्रती सनातन संस्था कृतज्ञ आहे ! – संपादक, दैनिक  सनातन प्रभात) 
 

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती
यांच्या कार्यामुळे हिंदु राष्ट्र येणार याची निश्‍चिती वाटते !
– श्री. बापू ढगे, उपाध्यक्ष, भावसार समाज, सोलापूर, महाराष्ट्र

bapu_dhage१० वर्षांपूर्वी हिंदु राष्ट्र येईल कि नाही, अशी शंका होती; पण सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती करत असलेले कार्य पाहून हिंदु राष्ट्राची स्थापना होणारच, याची निश्‍चिती वाटते. छत्रपती शिवाजी महाराजांनी आध्यात्मिक सामर्थ्यामुळे हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. आज हिंदुत्वासाठी कार्य करणार्‍या पुष्कळ संघटना आहेत; मात्र सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती आध्यात्मिक स्तरावर कार्य करत असल्याने त्यांचे कार्य सर्वत्र वाढत आहे. सनातन संस्थेच्या संपर्कात आल्यामुळे आणि साधना केल्यामुळे धर्मरक्षणाच्या कार्यात यश येत असून हिंदूंचा प्रतिसादही वाढला आहे.
 

संदर्भ : दैनिक  सनातन प्रभात