हिंदु राष्ट्र-संघटक अधिवेशनातील मान्यवरांचे उद्बोधक विचार !

धर्मांतर रोखण्यासाठी कायद्याचे ज्ञान आवश्यक !
– श्री. अतुल जेसवानी, संस्थापक अध्यक्ष, हिंदु सेवा परिषद, जबलपूर, मध्यप्रदेश 

atul_jeswaniमुसलमान लव्ह जिहाद आणि ख्रिस्ती सेवेच्या माध्यमातून हिंदूंचे धर्मांतर करत आहेत. हिंदु मुलगी मुसलमान युवकासह पळून जाते आणि त्याच्याशी विवाह करून मुसलमान होते, हेही धर्मांतरच आहे. त्यानंतर त्यांची पिळवणूक झाल्यावर खरे वास्तव त्यांच्या लक्षात येते, तेव्हा वेळ निघून गेलेली असते. यात हिंदु मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. हे कटू सत्य हिंदु मुलींना समजावून सांगणे अजूनही कठीण होत आहे; कारण धर्मशिक्षणाचा अभाव ! हिंदूंमधील धर्मशिक्षणाच्या अभावामुळे आजही मुसलमान आणि ख्रिस्ती त्यांच्यावर वरचढ ठरत आहेत. आज हिंदू त्यांच्या मुलांना सर्व सुखसुविधा पुरवतात; मात्र त्यांच्यावर योग्य संस्कार करणे टाळतात. त्यामुळे त्यांनी आपल्या व्यवसायातून थोडा वेळ काढून मुलांवर चांगले संस्कार केले पाहिजेत. लव्ह जिहादपासून हिंदु मुलींचे रक्षण करतांना आपल्याला कायद्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे. कायद्याच्या माध्यमातून आपण या धर्मांतराला आळा घालू शकतो.

संघटनांच्या कार्यकर्त्यांनी झोपडपट्यांमध्ये हिंदूंचे संघटन केले पाहिजे. ज्या भागात साधे दुचाकी वाहन जाऊ शकत नाही, अशा ठिकाणी फार पूर्वीपासून ख्रिस्ती मिशनरी पोचलेले असतात. हे मिशनरी हिंदूंचे नाव धारण करून सेवेच्या नावाखाली धर्मांतर करत असतात.

जबलपूर येथे एका संस्कृतीहीन संबंध पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीला आम्ही विरोध केला. ही पार्टी आम्ही थांबवू शकलो नाही; मात्र या पार्टीमध्ये मद्यसेवनावर प्रतिबंध करू शकलो. अशाच प्रकारच्या मेजवानीचे जेव्हा दुसर्‍यांदा आयोजन करण्यात आले, तेव्हा आम्ही त्याला प्रखर विरोध केला. त्यामुळे पोलिसांनी या मेजवानीला अनुमती नाकारली आणि ही मेजवानी रहित झाली. अशा सर्व मेजवान्यांचे आयोजक मुसलमान असतात.

आपत्काळाचा अपलाभ उठवणार्‍या ख्रिस्ती
मिशनर्‍यांपासून सावध रहा ! – श्री. सागर कटवाल, नेपाळ 

sagar_katwalनेपाळमध्ये भूकंप झाल्यानंतर त्या संदर्भात हिंदुत्ववादी संघटनांनी मोठ्या प्रमाणात आपत्कालीन साहाय्य केले; मात्र या आपत्काळाचा अपलाभ उठवण्याचा प्रयत्न ख्रिस्ती मिशनर्‍यांनी अधिक प्रमाणात केला. त्यांनी भूकंपानंतर २ घंट्यांत सामाजिक संकेतस्थळावर नेपाळसाठी प्रार्थना करा !, असे आवाहन करून सहानुभूती मिळवली. आम्ही भूकंपपीडितांना साहाय्य केले; मात्र मिशनर्‍यांनी पीडितांच्या मुलांसाठी लगेचच तात्पुरत्या शाळा चालू केल्या. त्यांनी काही लोकांसाठी घरे बांधण्यास प्रारंभ केला. आम्हीही त्यांच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात साहाय्य केले; मात्र ख्रिस्त्यांनी नियोजनपूर्वक आपत्काळाचा अपलाभ उठवला. त्यामुळे अशा मिशनर्‍यांपासून सावध रहा, असे आवाहन नेपाळ येथील राष्ट्रीय हिंदू युवा आंदोलनाचे श्री. सागर कटवाल यांनी केले.

श्री. सागर कटवाल यांनी आवाहन केले की, नेपाळला पुन्हा हिंदु राष्ट्र करण्यासाठी भारताने पाठिंबा द्यावा त्या आवाहनाला प्रतिसाद देत सर्व हिंदुत्ववाद्यांनी कटवालजी आगे बढो, हम तुम्हारे साथ है । अशा घोषणा दिल्या.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती
यांच्या मार्गदर्शनामुळे धर्मकार्य शक्य ! – श्री. अतुल जेसवानी,
संस्थापक अध्यक्ष, हिंदु सेवा परिषद, जबलपूर, मध्यप्रदेश

हिंदूंवर होत असलेल्या आघातांच्या विरोधात हिंदु सेवा परिषद लढत असून आम्हाला चांगले यशही मिळत आहे. हे धर्मकार्य सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती करत असलेल्या मार्गर्शनामुळे शक्य होते. जे मार्गदर्शन ही संघटना करते, ते ९० वर्षांची हिंदुत्ववादी संघटनाही करत नाही.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात