ओडिशातील श्री. प्रेम प्रकाश कुमार यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

ही केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांची कृपा ! – श्री. प्रेम प्रकाश कुमार

IMG_6842_Prem_prakash_kumar_
श्री. प्रेम प्रकाश कुमार (उजवीकडे) यांचा सत्कार करतांना पू. नंदकुमार जाधव

 विद्याधिराज सभागृह, रामनाथी (गोवा) : माझी आध्यात्मिक पातळी घोषित केली जाणे, यात माझे कोणतेही कर्तृत्व नाही. मी काहीही केलेले नाही. अध्यात्मात करणारे कुणीतरी (गुरु) असते आणि त्याचा लाभ कुणालातरी (शिष्याला) होत असतो. आध्यात्मिक प्रगतीसाठी मी अपात्र आहे. ही सर्व परात्पर गुरु डॉ. आठवले यांचीच कृपा आहे, असे भावोद्गार ओडिशातील हिंदु धर्माभिमानी श्री. प्रेम प्रकाश कुमार यांनी व्यक्त केले. पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात २२ जूनला सायंकाळच्या सत्रात श्री. प्रेम प्रकाश कुमार यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे घोषित करण्यात आले. सनातन संस्थेचे धर्मप्रसारसेवक पू. नंदकुमार जाधव यांच्या शुभहस्ते श्रीकृष्णाची सनातन-निर्मित प्रतिमा आणि पुष्प देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

हिंदु जनजागृती समितीचे ओडिशातील कार्यकर्ते श्री. प्रकाश मालोंडकर म्हणाले, श्री. प्रेम प्रकाश कुमार यांच्या धर्मपत्नीला संपर्क केला, तेव्हा त्या म्हणाल्या की, श्री. प्रेम प्रकाश कुमार यांनी अधिवेशनाला आल्यापासून घरी संपर्कच केलेला नाही. आता ते आध्यात्मिक प्रगती करूनच येतील, असे वाटले. खरोखरच आज हा सत्कार झाला.

प्रेम प्रकाश कुमार यांची गुणवैशिष्ट्ये आणि कार्य !

श्री. प्रेम प्रकाश कुमार यांनी विश्‍व हिंदू परिषदेच्या माध्यमातून १० वर्षेे हिंदुत्वाचे कार्य केले. कार्याला मोठ्या प्रमाणात यश मिळाले; मात्र ते मनःशांतीच्या शोधात होते. तिसर्‍या अधिवेशनापासून ते नियमितपणे अधिवेशनाला येतात. त्यांची आर्थिक स्थिती बेताची असूनही त्यांनी धर्मकार्यासाठी सपत्नीक पूर्णवेळ सेवा चालू केली. त्यांना ४ वर्षांचा मुलगा आहे. त्यांनी गेल्या वर्षभरात नामजप, प्रार्थना आणि सेवा केली. डोंगराळ भागात अनेक कष्ट सोसून धर्मप्रसार केला. २१ जूनला त्यांनी अधिवेशनात त्यांची अनुभूती सांगितली असता, सर्वांची भावजागृती झाली. नम्रता, आज्ञाधारकपणा, संयम आणि ध्येयनिष्ठता ही श्री. प्रेम प्रकाश कुमार यांची गुणवैशिष्ट्ये आहेत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात