पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनातील तृतीय दिवशीचा वृत्तांत आणि क्षणचित्रे

संस्कृतीशी समरस होणे म्हणजे स्वदेशी !
– गव्यसिद्धाचार्य डॉ. निरंजन वर्मा, गुरुकुलपति,
पंचगव्य गुरुकुलम् कांचीपुरम्, तमिळनाडू    

विद्याधिराज सभागृह, रामनाथी (गोवा) : पंचमहाभूतांचे संतुलन ठेवून जगणे स्वदेशी आहे. केवळ देशात निर्माण झालेली वस्तू उपयोगात आणणे म्हणजे स्वदेशी स्वीकारणे नाही, तर या देशाच्या भूगोलाशी जुळवून घेणेे स्वदेशी आहे. येथील भूगोल हे आमचे राष्ट्र आहे. जेथे आपण रहातो, तेथील पंचमहाभूतांशी संतुलन ठेवून जीवन जगणे हे स्वदेशी आहे. येथील संस्कृतीशी समरस होणे स्वदेशी आहे, असे प्रतिपादन गव्यसिद्धाचार्य डॉ. निरंजन वर्मा यांनी गोवा येथील पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या तिसर्‍या दिवशी प्रथम सत्रात केले.

गाय आणि नंदी यांच्या गव्यामुळे भारतात वीर पुरुष निर्माण होतील !     

IMG_6627_Niranjan_Varma_Clrते पुढे म्हणाले, “गायीच्या अस्तित्वाशिवाय ही सृष्टीच अपूर्ण आहे. आपण गायीचे सान्निध्य स्वीकारले पाहिजे. पूर्वीचा भारत निर्माण करण्यासाठी गायीचे पालन करणे आवश्यक आहे. ज्या राष्ट्रात गाय आणि नंदी नाही, तेथे वीर पुरुष निर्माण होणार नाहीत. समृद्ध गाय आणि समृद्ध नंदी यांच्या गव्यामुळे वीर पुरुष निर्माण होतो. या गव्यामुळेच येथे श्रीकृष्ण आणि अर्जुन निर्माण होतील. त्यामुळे पुन्हा हे राष्ट्र विश्‍वगुरु बनेल. त्याकरता पुन्हा गायीचे संगोपन होणे आवश्यक आहे.     

१९ व्या शतकापर्यंत संपूर्ण भारत विकेंद्रित होता. प्रत्येक जिल्हा, गाव स्वयंपूर्ण होते. त्या त्या भागात मनुष्याच्या मूलभूत गरजांची पूर्तता होत होती. प्रत्येक चौकात पाणपोयीची व्यवस्था होती. येथील भाषा, खानपान, ज्ञान, अर्थव्यवस्था, आदी विकेंद्रीत होती; मात्र आता या गोष्टींचे केंद्रीकरण करण्यात आले. त्यामुळे इंग्रजांच्या राजवटीनंतर केवळ ६८ वर्षांत भारताची दुर्दशा झाली, त्याला नष्ट करण्यात आले. सध्या आपला भारत जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय मुद्रा कोष या दोघांच्या कह्यात गेला आहे. त्यातून देशाला मुक्त केले पाहिजे.     

पूर्वी प्रजा सुखी असेल, तर राजा सुखी राहील, अशी भावना होती. आता प्रजा दुःखी, पिडलेली असेल, तर त्यांच्यावर राज्य करणे सोयीचे असते, अशी विचारधारा बनली आहे. त्यामुळे जनतेला आजारी पाडण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. देश स्वतंत्र झाल्यापासून देशात आजारपण वाढले आहे. देशातील ५० टक्के जनता गंभीर आजारांनी पीडित आहेत. यामागील कारण आपल्या व्यवस्थेचे केंद्रीकरण असणे होय.”

 गोहत्या हेे हिंदूंना नष्ट करण्याचे एक षड्यंत्र !
– अधिवक्ता सुरेशचंद्र पंडा,राज्य अध्यक्ष,
बिश्‍वो गो सुरख्या वाहिनी, कटक, ओडिशा

Sureshchandra_Panda_June2016_Cआईनंतर गोमातेच्या दुधापासून मनुष्याचे पोषण होते. गोमातेमुळे येथील हिंदू धष्टपुष्ट होतात. गोमाता नष्ट केल्याने भारतातील हिंदूही आपोआपच नष्ट होणार आहेत. त्यामुळे गोहत्या हेे हिंदूंना नष्ट करण्याचे एक षड्यंत्र आहे. ‘गोहत्येबरोबरच हिंदु राष्ट्राची चळवळ खंडित होणार आहे’, असाही हिंदूविरोधकांचा विचार आहे.     

कोणतीही संघटना, पक्ष किंवा संस्था यांतील लोकांनी गोमातेसाठी कार्य केले, तर त्यांचे जीवनाचे सार्थक होणार आहे, अन्यथा त्यांचे जीवन व्यर्थ जाईल. गोमातेच्या रक्षणामुळे केवळ भारतच नाही, तर सर्व मानवजातीचे कल्याण होणार आहे. जे माझ्या गोमातेची हत्या करत आहेत, त्यांचा प्रतिकार करण्यासाठी मला आशीर्वाद हवा आहे.

राजकारण्यांनी देवभूमी गोव्याला ‘रोम’ केले !
– श्री. हनुमंत परब, अध्यक्ष, गोवंश रक्षा अभियान, गोवा 

IMG_6623_Hanumant_Parab_cगोवा परशुरामभूमी आहे, तिला देवभूमीही मानण्यात येते. अशा या भूमीला राजकारण्यांनी रोमची भूमी बनवले आहे. येथे ८० टक्के हिंदू आहेत. १३ टक्के ख्रिस्ती आहेत आणि बाकी इतर पंथीय आहेत. असे असतांना देशात देवभूमी असलेला गोवा भोगभूमी असल्याचा अपप्रचार करण्यात येत आहे.     

येथील भाजपचे शासन ख्रिस्त्यांच्या दबावाखाली काम करत आहे. एकगठ्ठा मतांसाठी ख्रिस्ती आणि मुसलमान यांच्यासाठी कार्य करत आहेत. त्यामुळे ते गोमातेसाठी काहीच करू शकत नाहीत. हिंदुत्ववाद्यांच्या विरोधामुळे राज्यात असलेेले शासकीय पशूवधगृह वर्ष २०१३ या वर्षी बंद करण्यात आले होते. राज्यशासनाने या पशूवधगृहाच्या आधुनिकीकरणासाठी १६ कोटी रुपये व्यय करून पुन्हा ते चालू केले. गोरक्षकांनी काही अनधिकृत पशूवधगृहे बंद पाडलेली आहेत. त्यानंतर शेजारच्या कर्नाटकातून गोमांस राज्यात येत आहे. याला शासनाचा पाठिंबा आहे. हे शासन हिंदूंसाठी काहीच करत नाही. याचे परिणाम आगामी निवडणुकीत शासनाला भोगावे लागणार आहेत. राज्यात गोवंशाच्या रक्षणासाठी गोवंश हत्याबंदी कायदा आवश्यक आहे. गोवंश हत्याबंदी कायदा संपूर्ण भारतात होईल, त्यासाठी सर्व हिंदुत्ववाद्यांना संघटित होऊन प्रयत्न करणे आवश्यक आहे. गोमातेचे रक्षण झाले, तर हिंदु राष्ट्र येईल.

हिंदु राष्ट्र स्थापनेची वेळ आली आहे !
– श्री. मुरली मनोहर शर्मा, राष्ट्रीय
सह-संयोजक, भारत रक्षा मंच, खोरधा, ओडिशा 

Murli_Manohar3_Sharma_june2015१८ व्या शतकांपूर्वी भारतात गोहत्या होत नव्हती. सर्वाधिक क्रूरकर्मा औरंगजेबाच्या काळातही गोहत्या झाली नाही; मात्र स्वतंत्र भारतात उघडपणे गोहत्या होत आहेत. ओडिशातूनही बांगलादेशात मोठ्या प्रमाणात गोतस्करी होत आहे. हे थांबवण्याचे कार्य भारत रक्षा मंच करत आहे. ज्याप्रमाणे देशात मुसलमानांच्या लोकसंख्येचे प्रमाण वाढत आहे, तसा देशातून हळूहळू गोवंश लुप्त होत आहे. गोमांसाचे मुख्य व्यापारी मुसलमान आहेत; मात्र गायीची विक्री करणारे, त्यांना वाहनात भरून विक्रीकरता घेऊन जाणारे हिंदूच आहेत.  

आता आम्ही हिंदु राष्ट्रासाठी प्रयत्न केले नाही, तर पुढे कधीच प्रयत्न करू शकणार नाही. आता जागे होण्याची वेळ आली आहे. आपल्याला जोमाने प्रयत्न करणे आवश्यक आहे. प्रयत्न केल्यास हिंदु राष्ट्र आल्याशिवाय रहाणार नाही. आतापर्यंत मुसलमान हिंदूंवर अत्याचार करत आले; मात्र आता हिंदूंनी प्रतिकार करण्याची वेळ आली आहे. आम्ही हरिचे दास आहोत. हिंदु राष्ट्राची स्थापना ईश्‍वर करणारच आहोत. ईश्‍वर आमच्याकडून हे कार्य करून घेणारच आहे.

सनातन हिंदु धर्म सर्वश्रेष्ठ; मात्र हिंदूंचे
धर्माचरण अत्यावश्यक ! – पू. साध्वी रेखाबहनजी, गुजरात

Pu_Rekha_Bahan_June2016_colसनातन हिंदु धर्म सर्वश्रेष्ठ आहे. विश्‍वाला गणित देणारे श्रीनिवासन् रामानुजाचार्य, गुरुत्वाकर्षणाचा शोध लावणारे भास्कराचार्य भारतीय संस्कृतीनेच दिले. त्यामुळेच अमेरिकेतील विद्यापिठांत गीता शिकवली जाते. फ्रेंच शास्त्रज्ञ अ‍ॅन्टोनी डेव्हिस हा ॐकारातून येणार्‍या मोठ्या ऊर्जेमुळे चकित होतो. आज पाश्‍चात्त्यांच्या विकृतींमागे हिंदू धावत आहेत; मात्र त्यांना त्यासाठी भारतीय संस्कृतीची महती समजलेली नाही. त्यासाठीच संत श्री आसारामजी बापू यांनी १४ फेबु्रवारीला मातृ-पितृ दिवस घोषित केला. २५ डिसेंबर ते १ जानेवारी या कालावधीत तुलसीपूजन, गोरक्षण इत्यादींचे आयोजन करण्याची कल्पना मांडली. हिंदु पद्धतीनुसार सण साजरे करणे, आदिवासी भागातील हिंदूंना आधार देणे, व्यसनमुक्ती आदींचे प्रयोजन केले आहे. हिंदु धर्म सर्वश्रेष्ठ आहे; मात्र त्याचे आचरण केले नाही, तर हिंदु धर्म होता, असे म्हणण्याची वेळ येऊ शकते. त्यासाठीच हिंदु धर्माचे आचरण करणे, हे अत्यावश्यक आहे, असे मार्गदर्शन संत श्री आसारामजीबापू यांच्या शिष्या पू. साध्वी रेखाबहनजी यांनी केले. पू. रेखाबहनजी यांच्या मार्गदर्शनाच्या वेळी संत श्री आसारामजीबापू यांनी समाजहितासाठी केलेल्या कार्याच्या लहान-लहान ध्वनीचित्रचकत्या दाखवल्याने विषय परिणामकारक झाला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात