संतांच्या उपस्थितीत अन् वेदमंत्राच्या घोषात पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाला प्रारंभ !

हिंदूंनो, हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कटिबद्ध व्हा !

Adhiveshan2016_deep_prajwalan

    रामनाथी (गोवा) – हिंदु राष्ट्राच्या (सनातन धर्म राज्याच्या) स्थापनेसाठी आज, 19 जूनच्या सकाळी संतांच्या उपस्थितीत आणि वेदमंत्रांच्या घोषात हिंदु जनजागृती समिती आयोजित पंचम अखिल भारतीय हिंदु अधिवेशनाला प्रारंभ झाला. या वेळी सनातनच्या संत पू. (कु.) अनुराधा वाडेकर; वैदिक उपासना पीठाच्या पू. तनुजा ठाकूर; गुजरात येथील पू. स्वामी दिव्यजीवनदास महाराज आणि तुळजापूर, महाराष्ट्र येथील पंचदशनाम जुना आखाडाचे महंत इच्छागिरी महाराज आणि हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. या अधिवेशनाला भारतातील 22 राज्यांसह नेपाळ, श्रीलंका येथील 161 हून अधिक हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे 400 हून अधिक प्रतिनिधी उपस्थित राहिले आहेत. या वेळी संत आणि मान्यवर यांनी हिंदूंना हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कटिबद्ध होण्याचे आवाहन केले.

हिंदु जनजागृती समिती जगात
उत्कृष्ट कार्य करत आहे ! – महंत इच्छागिरी महाराज

हिंदू अधिवेशनाचे आयोजन करणारी हिंदु जनजागृती समिती जगात उत्कृष्ट कार्य करत आहे. सनातन संस्थेचे रामनाथी येथील आश्रम पाहुन भावी हिंदु राष्ट्र कसे असेल, याची कल्पना येते.

हिंदूंनी हिंदु राष्ट्रासाठी
पाऊल उचलावे ! – स्वामी दिव्य जीवनदास महाराज

हिंदूंनी असे पाऊल उचलावे, ज्याने हिंदु राष्ट्र समीप येईल, असे प्रतिपादन पू. स्वामी दिव्य जीवनदास महाराज यांनी केले. त्यांनी हिंदूंकडून केल्या जाणार्‍या पाश्‍चात्त्यांच्या अंधानुकरणावर टीका केली.

देशात हिंदु राहिला, तरच
राष्ट्र टिकेल ! – श्री. हरिशंकर जैन, ज्येष्ठ हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता

आज हिंदूंच्या श्रद्धास्थानांच्या संदर्भातील याचिकांवर हिंदुविरोधी निर्णय दिले जातात; कारण न्याय देणारे धर्मनिरपेक्ष शिक्षणप्रणालीतून आलेले आहेत. त्यांच्यावर तसे संस्कार झाले आहेत. या देशात हिंदु राहिला, तरच देश टिकेल अथवा इस्लामिक स्टेटसारखे त्याला नष्ट करतील.

हिंदुत्वनिष्ठांचे संघटनच हिंदु राष्ट्र
स्थापील ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती

हिंदु राष्ट्र हा शब्द उच्चारला, तरी पुरोगामी, निधर्मी, अन्य पंथीय आणि प्रसारमाध्यमे हिंदु राष्ट्राची मागणी ही घटनाबाह्य आहे, असा थयथयाट करतात. राज्यघटनेचा अर्धवट अभ्यास करणार्‍यांनी हिंदु राष्ट्राची मागणी ही संवैधानिकच आहे, हे समजून घेतले पाहिजे.