पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संदेश

हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या (सनातन धर्म राज्याच्या) यज्ञात
तन-मन-धन अर्पण करा !

1396953675_pp_dr_athavale_175
परात्पर गुरु डॉ. अाठवले

भारताच्या स्वातंत्र्ययज्ञात स्वप्राणांची आहुती देऊन क्रांतीसमिधा बनलेले राष्ट्रपुरुष हेच राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांच्यासमोरील खरे आदर्श आहेत. त्यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून मी हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) पहायला जिवंत असेन कि नसेन, हे मला ज्ञात नसतांनाही त्यासाठी कार्यरत आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांनी हिंदु राष्ट्रासाठी (सनातन धर्म राज्यासाठी) कार्यरत रहाणे आवश्यक आहे.

‘वेळेवर केलेले योग्य कार्य मोठे फळ देते’, असे योगवसिष्ठामध्ये सांगितले आहे. सध्या हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी (सनातन धर्म राज्यासाठी) आवश्यक कार्य करण्यासाठी काळ पूरक आहे. कालमाहात्म्याप्रमाणे वर्ष २०२३ मध्ये हिंदु राष्ट्राची (सनातन धर्म राज्याची) स्थापना होणारच आहे. या ८ वर्षांच्या कालावधीत हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी धर्मकार्य केल्यास हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) तर स्थापन होईलच; पण त्यासह प्रत्येकाला साधनेचे फळही मिळेल.

हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या (सनातन धर्म राज्याच्या) यज्ञात तन-मन-धन यांची आहुती द्या ! भगवान श्रीकृष्ण तुम्हाला ‘हिंदु राष्ट्र’ (सनातन धर्म राज्य) देईलच !

– (परात्पर गुरु) डॉ. जयंत बाळाजी आठवले, संस्थापक, सनातन संस्था.