नवीन पिढीला विज्ञानाच्या भाषेत अध्यात्म समजावण्याची सनातनची पद्धत चांगली ! – श्री १००८ महामंडलेश्‍वर, श्री विश्‍वगायत्री मिशन, गुजरात

प्रदर्शन पहातांना (वर्तुळात) श्री १००८ महामंडलेश्‍वर अलखगिरीजी महाराज

    उज्जैन – आपण धर्म मानणारे आहोत, तर नवीन पिढी विज्ञानाच्या आधारे चालणारी आहे. अशा वेळी तिला विज्ञानाच्या भाषेत धर्म समजावून सांगण्याची आवश्यकता आहे. सनातन या पद्धतीचा चांगला वापर करत आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय संत समितीचे कोषाध्यक्ष तथा गुजरात राज्यातील श्री विश्‍वगायत्री मिशनचे ब्रह्मपीठाधीश्‍वर श्री १००८ महामंडलेश्‍वर अलखगिरीजी महाराज यांनी केले. 

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने आयोजित धर्मशिक्षण विषयीच्या प्रदर्शनाला भेट दिल्यावर ते बोलत होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे समन्वयक श्री. विनय पानवळकर यांनी त्यांचा पुष्पहार, श्रीफळ आणि कुंभमेले का महिमा हा सनातनचा हिंदी भाषेतील ग्रंथ भेट देऊन सन्मान केला. या वेळी ओडिशा येथील हिंदु जनजागृती समितीचे श्री. श्रीराम काणे आणि समितीचे बंगाल येथील श्री. चित्तरंजन सुराल उपस्थित होते. या वेळी सनातनच्या गोवा येथील मुख्य आश्रमात येणार असल्याचे आश्‍वासन महाराजांनी दिले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात