सनातन संस्थेच्या प्रदर्शनास जागा देणारे स्वामी नारायण संप्रदायाचे पू. निरन्नमुक्तदासजी स्वामी (वकील स्वामी) !

पू. निरन्नमुक्तदासजी स्वामी (वकील स्वामी) यांचे आभार व्यक्त करतांना पू. (कु.) स्वाती खाडये

    उज्जैन – येथील सिंहस्थपर्व क्षेत्रात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने प्रदर्शन लावण्यात आले आहे. या वेळी सनातनच्या साधकांनी विनंती केल्यावर जवळच असलेल्या स्वामी नारायण संप्रदायाचे पू. निरन्नमुक्तदासजी स्वामी (वकील स्वामी) यांनी स्वतःच्या मांडवात लगेच प्रदर्शन लावण्याची अनुमती दिली. त्यासह सकाळ आणि संध्याकाळ सर्व साधकांसाठी ते नि:शुल्क चहाची व्यवस्था करत आहेत.

   पहिल्या राजयोगी (शाही) स्नानानंतर वादळी पाऊस झाल्यामुळे स्वामी नारायण संप्रदायाच्या मंडपाला त्याची झळ पोहोचली होती. त्यामुळे एक दिवस त्यांना चहाची व्यवस्था करता आली नव्हती. याविषयीची खंत वकील स्वामी यांच्या बोलण्यातून जाणवली. खरे तर मोठी आपत्ती असल्यामुळे असे होणे साहजिक असतानांही त्याविषयी अपराधीपणा वाटणारे पू. निरन्नमुक्तदासजी स्वामी (वकील स्वामी) यांच्याविषयी कृतज्ञता वाटली. सनातनवर असलेले त्यांचे प्रेम यातून दिसून आले !

– श्री. आप्पासाहेब सांगोलकर, पंढरपूर, सोलापूर.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात