प्रदर्शन पाहून प्रभावित झालेल्या जिज्ञासूंनी दाखवले अनेक जिज्ञासूंना सनातनचे प्रदर्शन !

प्रदर्शनाचा प्रसार करणारे खरे जिज्ञासू हीच हिंदु धर्माची खरी शक्ती !

उज्जैन येथील सनातन संस्थेचे प्रदर्शन पहाण्यासाठी
९ वेळा जिज्ञासूंना आणणार्‍या सौ. रजनी रमेश लोहार आणि ४ वेळा आणणार्‍या कु. निकिता बोडाना !

सौ. रजनी रमेश लोहार

  उज्जैन – सिंहस्थ क्षेत्रामध्ये नया गुजराती लोहार समाज यांच्या वतीने एक मांडव उभारण्यात आलेला आहे. त्या ठिकाणी आलेल्या सौ. रजनी रमेश लोहार (अंदाजे ५० वर्षे) यांनी सनातन संस्थेचे प्रदर्शन एकदा पाहिल्यावर त्या इतक्या प्रभावित झाल्या की, त्यांनी स्वतःला समजलेली माहिती अन्य आपल्या सहकार्‍यांना समजावी; म्हणून सलग ९ वेळा अनेक जिज्ञासूंना प्रदर्शन पाहण्यासाठी त्या घेऊन आल्या. अन्य सहाकार्‍यांचे प्रदर्शन पाहून होईपर्यंत त्या बसून रहातात. पुन्हा नव्या जिज्ञासूंना प्रदर्शन पहाण्यासाठी घेऊन येतात.

 

 

 

कु. निकिता बोडाना

अशाच प्रकारे १२ वर्षांची मुलगी कु. निकिता बोडाना (मक्सीरोड, उज्जैन, मध्यप्रदेश) हिने प्रदर्शन पाहिल्यावर तिने सलग चार वेळा तिच्या अनेक नातेवाइकांना बोलावून प्रदर्शन दाखवले.
याविषयी भूमिका स्पष्ट करतांना कु. निकिता म्हणाल्या की, मला प्रदर्शन पाहून प्रेरणा मिळाली. आपल्या धर्मासाठी जागृत झाले पाहिजे. मला तुमच्या प्रदर्शनाची पद्धत चांगली वाटली. आपल्या धर्माचे, संस्कृतीचे ज्ञान सर्व लोकांना झाले पाहिजे, या उद्देशाने मी माझ्या नातेवाइकांना घेऊन येत आहे. मला जे समजले, ते इतरांनाही समजले पाहिजे.

अशा प्रकारे आणखीन काही जिज्ञासूंनीही तीन-चार वेळा प्रदर्शनाला भेट देऊन समवेत अन्य सहकारी अन् नातेवाइक यांना घेऊन आले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात