उज्जैन सिंहस्थक्षेत्री संतांच्या पदस्पर्शाने पुनित होत असलेले सनातन आणि हिंदु जनजागृती समिती यांचे प्रदर्शन !

श्री स्वामी प्रणवानंद सरस्वती यांचा सन्मान करतांना पू. डॉ. पिंगळे

उज्जैन – सिंहस्थ क्षेत्री सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीचे प्रदर्शन संतांच्या कृपादृष्टीने न्हाऊन निघाले आहे. जवळपास प्रत्येक दिवशी संतांचे चरणधुळीने प्रदर्शन पावन होत आहे. तीव्र वादळी पावसामुळे आणि नैसर्गिक संकटामुळेही प्रदर्शन खंडित झाले नाही.
१३ मे २०१६ या दिवशी सकाळी रायपूर, छत्तीसगड येथील प्रेम प्रकाश मंडलचे स्वामी हेमंत प्रकाशजी यांनी त्यांच्या शिष्यांसह भेट दिली, तर संध्याकाळी अखंडानन्द आश्रम, मोतीझील, वृन्दावन, उत्तरप्रदेशचे महामंडलेश्‍वर आचार्य श्री स्वामी प्रणवानंद सरस्वती आणि त्यांच्या नंतर प.पू. देवराहा बाबा यांचे शिष्य स्वामी नारायणदास आणि अस्सी घाट, वाराणसी येथील स्वामी वासुदेवदास यांचे आगमन झाले. सर्व संतांचे आगमन आणि आशीर्वचन यांमुळे प्रदर्शनातील सर्व साधकांच्या उत्साहात वृद्धी झाली.

प्रदर्शनाविषयी जाणून घेतांना स्वामी हेमंत प्रकाशजी महाराज (मध्यभागी)
पू. डॉ. पिंगळे यांच्याशी चर्चा करतांना स्वामी नारायणदास आणि त्यांच्यामागे स्वामी वसुदेवदास

सनातनच्या कार्यात सहभागी होण्यास मी सिद्ध आहे !
– महामंडलेश्‍वर आचार्य श्री स्वामी प्रणवानंद सरस्वती, अखण्डानन्द आश्रम, मोतीझील, वृन्दावन, उत्तरप्रदेश 

सनातनचे कार्य आतापर्यंत मी ऐकले होते; परंतु प्रदर्शनाला प्रत्यक्ष भेट देऊन मला कार्याची व्याप्ती लक्षात आली. या कार्यात मला सहभागी करून घ्यावे. सनातन करत असलेल्या कार्यात सहभागी होण्यास मी सिद्ध आहे, असे उत्साहवर्धक वचन अखंडानन्द आश्रम, मोतीझील, वृन्दावन, उत्तरप्रदेशचे महामंडलेश्‍वर आचार्य श्री स्वामी प्रणवानंद सरस्वती यांनी दिले. प्रदर्शनाला भेट दिल्यावर ते बोलत होते. या वेळेस हिंदु जनजागृती समितीचे श्री. चितरंजन सुराल यांनी प्रदर्शनाची माहिती सांगितली, तर हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या हस्ते पुष्पहार आणि श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

क्षणचित्रे

१. महाराजांना प्रदर्शनावरील उत्पादने पुष्कळ आवडली. त्यांनी स्वत:हून कुंकवाचे अर्पणमूल्य विचारून त्यांच्या भक्तांना ते विकत घ्यायला सांगितले.
२. हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांना त्यांच्या प्रदर्शनस्थळी त्यांनी आमंत्रित केले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात