सनातनच्या कार्याची समाजाला आवश्यकता ! – मान्यवरांचे मनोगत

अध्यात्मातील अधिकारी व्यक्तींसह
समाजातील विविध क्षेत्रांतील लोकांची प्रदर्शनाला भेट !

डावीकडून प्रदर्शन पहातांना प.पू. स.गु. निरन्नमुक्तदासजी स्वामी आणि त्यांना माहिती सांगतांना श्री. प्रवीण नाईक

    उज्जैन (सिंहस्थ पर्वक्षेत्र), १ मे (वार्ता.) – उज्जैन सिंहस्थ क्षेत्री सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे राष्ट्र आणि धर्म विषयी प्रदर्शन जिज्ञासू, राष्ट्र आणि धर्म प्रेमी यांच्यासाठी जणू पर्वणी ठरली आहे. अनेक मान्यवरांनी सनातनच्या कार्याची समाजाला आवश्यकता असल्याचे सांगितले. एकीकडे संत आणि मान्यवर प्रदर्शनाला भेट देऊन त्यांच्या आशीर्वचनाने साधकांना उपकृत करत आहेत, तर दुसरीकडे समाजातील विविध क्षेत्रांतील संस्था आणि धर्माभिमानी हे सनातन आणि समिती यांचे कार्य जाणून घेत आहेत अन् ते या कार्याशी जोडले जात आहेत. प्रदर्शनाच्या सहाव्या दिवशी महाराष्ट्रातील प.पू. स.गु. निरन्नमुक्तदासजी स्वामी (वकील स्वामी) यांनी प्रदर्शन पाहिल्यावर कार्याला आशीर्वाद दिले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या हस्ते पुष्पहार आणि श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

    संतांच्या पावन आगमनासह सिंहस्थातील सुरक्षेचे दायित्व सांभाळणार्‍या पोलिसांनी एकत्रितपणे येऊन प्रदर्शन पाहिले. पोलिसांसह ई. टी.व्ही. मध्यप्रदेश या वृत्तवाहिनीचे विभागीय पत्रकार श्री. वीरेंद्र शर्मा, मध्यप्रदेश श्रमजीवी पत्रकारसंघाचे अध्यक्ष आणि राज एक्स्प्रेस वृत्तपत्राचे ब्युरो चीफ श्री. बाबूसिंह केरवाल, दैनिक अवंतिकाचे श्री. लखन परमार, दैनिक अक्षरविश्‍वचे श्री. सुखरामसिंह तोमर आणि पत्रकार श्री. हरिशसिंह गुडपालिया या पत्रकारांनीही प्रदर्शनाला भेट दिली.

क्षणचित्र : ई. टी.व्ही. मध्यप्रदेशचे पत्रकार श्री. वीरेंद्र शर्मा यांना संस्था आणि समिती यांनी उभारलेले प्रदर्शन आवडल्याने त्यांनी त्यांच्या १० पत्रकार मित्रांना प्रदर्शन पहायला निमंत्रित केले. त्यांपैकी दैनिक अवंतिकाचे श्री. लखन परमार आणि दैनिक अक्षरविश्‍वचे श्री. सुखरामसिंह तोमर हे लगेच प्रदर्शन पहाण्यासाठी आले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात