हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची सूक्ष्मातील आणि स्थुलातील प्रक्रिया

१. लेख लिहिण्यामागील पूर्वपीठिका

लोकसभेच्या निवडणुकीत भाजपचा विजय झाल्यानंतर हिंदूंसाठी आता चांगले दिवस येतील, अशी अनेक धर्मप्रेमी लोकांनी अपेक्षा व्यक्त केली आहे. हे एक प्रकारचे मानसिक पातळीचे विश्‍लेषण आहे. राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी आध्यात्मिक स्तरावर कार्य करणार्‍यांना २०२३ या वर्षी भारत धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र होईल, याचे यथोचित ज्ञान असल्याने ते तात्कालिक राजकीय परिवर्तनाने हुरळून जात नाहीत. तसेच त्यांचे आध्यात्मिक स्तरावरील कार्यही निरंतर चालू रहाते. सनातन संस्था अशाच प्रकारचे आध्यात्मिक स्तरावर कार्य सध्या करत आहे.

साधारणतः २० वर्षांपूर्वी ठिकठिकाणी होणार्‍या सनातनच्या जाहीर कार्यक्रमांचे साहित्य ने-आण करणार्‍या ट्रकवर सनातन संस्थेने हिंदु राष्ट्र स्थापनेचे वेळापत्रक, असे लिखाण रंगवले होते. त्यात १९९७ ते २०२३ या कालावधीत हिंदूंनी क्षात्रधर्माचे कार्य कसे करायचे आहे, याचे वेळापत्रक देण्यासह भारतात २०२३ नंतर धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना होईल !, असे स्पष्टपणे लिहिले होते. हा विषय अनेकांपर्यंत पोहोचावा, हाच तो ट्रक रंगवण्यामागील हेतू होता. अनेकांनी त्या ट्रकवर लिहिलेले हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे दीर्घकालीन नियोजन स्मरणात ठेवले. प्रज्ञालोकचे व्यवस्थापक माननीय श्री. भा.म. वर्तक यांच्याही ते लक्षात होते. भाजपचा लोकसभेच्या निवडणुकीत विजय झाल्यानंतर त्यांचा माझ्यासाठी निरोप आला की, २० वर्षांपूर्वी जे सनातनच्या ट्रकवर लिहिले होते, ते सत्य नरेंद्र मोदींच्या विजयामुळे खरे ठरू पहात आहे का ? या संदर्भात एखादे आपले काही टीपण असल्यास ते प्रज्ञालोकसाठी अवश्य पाठवावे. त्यांचा निरोप आल्यानंतर या विषयावर काही दिवसांपासून चालू असलेले लिखाण प्राधान्याने पूर्ण केले.

हे लिखाण आध्यात्मिक दृष्टीकोनातून अधिक आहे. त्यामुळे ते वाचणार्‍यांना समजण्यास जरा कठीण जाईल; पण ज्ञानजिज्ञासा असलेल्यांना या लिखाणातून अवश्य आनंदही मिळेल

 

२. भारतात हिंदु राष्ट्र स्थापन होण्यामागील आध्यात्मिक कारणे

स्थुलातून घडणार्‍या घटनांमागे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक कारणे असतात. त्यापैकी शारीरिक आणि मानसिक कारणांविषयी ती घटना घडल्यानंतर प्रसारमाध्यमांतील विचारवेत्त्यांकडून चर्चा होत असते. आध्यात्मिक कारणे ही बुद्धीअगम्य असल्याने बुद्धीप्रामाण्यवादी लोकांना त्याविषयी चर्चा करण्यास मर्यादा येतात. बुद्धीप्रामाण्यवादी लोक बुद्धीचा वापर करून प्रमाण ठरवत असल्याने ते स्थुलातील कारणांचा विचार करू शकतात. याउलट चांगली साधना करणारे किंवा अध्यात्मात प्रगती केलेले उन्नत साधक विश्‍वमन आणि विश्‍वबुद्धी यांच्यातील विचार ग्रहण करू शकतात. यालाच सूक्ष्मातील कळणे, असे म्हणतात. या लेखात हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या संदर्भात प्रामुख्याने बुद्धीअगम्य आध्यात्मिक कारणांचा वेध घेतला आहे.

२ अ. कालमाहात्म्य

कोणत्याही गोष्टीसाठी योग्य वेळ येणे आवश्यक असते. द्रष्ट्या आणि त्रिकालज्ञानी संतांना योग्य वेळी काय करायचे, याचे ज्ञान असते; म्हणूनच ते कालगतीनुसार एखादी गोष्ट सध्या करू नये किंवा पुढे करावी, असे सांगतात. आज भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना होईल, अशी आशा निर्माण होण्यासारख्या कोणत्याही घटना स्थुलातून घडत नसतांना हिंदु राष्ट्राविषयी इतक्या ठामपणे सांगणे, ही काहींना अतिशयोक्ती वाटेल; पण काळाची पावले ओळखणार्‍या संतांना २०२३ या वर्षी स्थापन होणार्‍या हिंदु राष्ट्राची चाहूल लागली आहे ! पुढील सूत्रे लक्षात घेतली, तर सर्वांनाच कालमाहात्म्य लक्षात येईल.

१. उन्हाळ्यात शेतात पेरणी करत नाहीत, तर ती करण्यासाठी पावसाळ्यापर्यंत थांबतात.

२. श्रीराम १४ वर्षे वनवासात राहिला आणि नंतरच त्याने अयोध्येचे राजेपद स्वीकारले.

३. द्रौपदीची राजसभेत विटंबना झाली, तरी श्रीकृष्णाने तेव्हाच कौरवांचा नाश केला नाही, तर १३ वर्षांनंतर केला.

४. शिशूपालाचे शंभर अपराध पूर्ण झाल्यानंतरच त्याचा श्रीकृष्णाने वध केला.

५. क्रांतीकारक कालमाहात्म्य लक्षात न घेता भावनेपोटी कृती करतात. त्यामुळे बर्‍याच जणांना यश न मिळताच मृत्यू येतो. त्यांच्या कृतीमुळे त्यांची प्राण अर्पण करण्याची व्यष्टी साधना होते; पण समष्टीला त्याचा विशेष लाभ होत नाही. याउलट क्रांतीकारक अरविंद घोष यांनी साधनेत प्रगती केली असल्यामुळे त्यांना १९४७ साली भारत स्वतंत्र होणार आहे, हे आधीच सूक्ष्मातून कळले होते. त्यामुळे त्यांनी क्रांतीचे विचार मनातून काढून टाकले. ते महर्षी झाले आणि त्यांनी लाखो जिवांना साधनेत मार्गदर्शन केले.

२ आ. सूक्ष्मातील देवासुर युद्ध

प्रत्येक घटना आणि कार्य स्थुलातून घडण्याआधीच सूक्ष्मातून घडत असते. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले आहे,

तस्मात्त्वमुत्तिष्ठ यशो लभस्व जित्वा शत्रून्भुङ्क्ष्व राज्यं समृद्धम् ।
मयैवैते निहताः पूर्वमेव निमित्तमात्रं भव सव्यसाचिन् ॥ – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ११, श्‍लोक ३३

अर्थ : म्हणूनच हे अर्जुना, ऊठ. यश मिळव. शत्रूंना जिंकून धनधान्यसंपन्न राज्याचा उपभोग घे. हे सर्व शूरवीर आधीच माझ्याकडून मारले गेलेले आहेत. हे सव्यसाची अर्जुना, तू केवळ निमित्तमात्र हो.

२ आ १. प्रत्येक युगात होणारे देवासुर युद्ध कलियुगातही सूक्ष्मातून चालू आहे !

प्राचीन काळी ऋषीमुनी यज्ञयागादी विधी करत. त्या वेळी राक्षस त्यात विघ्ने आणत. असुरांनी त्रेता आणि द्वापर युगांत देवतांना, तसेच प्रभु श्रीरामचंद्र आणि भगवान श्रीकृष्ण या साक्षात् अवतारांनाही त्रास दिला. आतापर्यंत जितकी देवासुर युद्धे झाली, त्यांत अंतिमतः जय हा देवता, अवतार आणि देवतांचा पक्ष घेऊन लढणार्‍यांचा झाला आहेे. भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी महर्षि अरविंद यांनी सूक्ष्मातील लढा देऊन भारताच्या वायव्येकडून येणार्‍या अनिष्ट शक्तींचे निर्मूलन केले होते. याविषयी त्यांच्या चरित्रातही उल्लेख आहे. तात्पर्य, प्रत्येक युगात देवासुर लढा निरंतर चालू असतो. कलियुगातही तो चालू आहे. भारतातील अनेक ज्ञात-अज्ञात संत, तसेच सनातनचे संत हे देवासुर युद्ध देवतांच्या पक्षातून लढत आहेत.

ब्राह्मतेज म्हणजे साधनेचे बळ असलेलेच सुक्ष्मातून युद्ध लढू शकतात. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे खरे कार्य या संतांमुळेच होणार आहे. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सूक्ष्मातून लढू शकणार्‍या १०० संतांची आवश्यकता आहे. आतापर्यंत (मार्च २०१५ पर्यंत) सनातनचे ५६ साधक संत झाले आहेत. कांची कामकोटी पिठाचे जगद्गुरु श्री शंकराचार्य स्वामी जयेंद्र सरस्वती देहली (दिल्ली) येथील एका सभेत म्हणाले होते, प्रत्येक युगात देवासुर युद्ध होत असते. या युगात सनातन संस्था ते युद्ध लढत आहे !

२ आ २. सूक्ष्मातील युद्धाचे काही वर्षांनी स्थूल, म्हणजेच दृश्य परिणाम दिसतात !

सप्तलोकातील दैवी किंवा चांगल्या आणि सप्तपाताळांतील अनिष्ट किंवा वाईट शक्ती यांत चालू असणार्‍या या लढ्याचे स्थुलातून प्रगटीकरण भूतलावर दिसून येते. पृथ्वीवर दुष्टप्रवृत्ती प्रबळ होणे अथवा हरणे, हा त्या सूक्ष्मातील युद्धाचा परिणाम असतो. आतापर्यंत पाचव्या पाताळापर्यंतच्या अनिष्ट शक्तींवर ब्राह्मतेजाद्वारे लढणार्‍या संतांनी विजय मिळवला आहे. सध्या ६ व्या पाताळांतील अनिष्ट शक्तींच्या विरोधात सूक्ष्मातील युद्ध चालू आहे. सातव्या पातळातील अनिष्ट शक्ती प्रभावहीन झाल्यानंतरच सूक्ष्मातील लढा संपेल. सूक्ष्मातील लढ्याचे काही वर्षांनी स्थूल, म्हणजेच दृश्य परिणाम दिसतात. लोकसभेच्या निवडणुकीत तमोगुणप्रधान काँग्रेसादी राजकीय पक्षांचा पराभव करून रजोगुणप्रधान भाजपादी राजकीय पक्षांचा झालेला विजय, हाही सूक्ष्मातील युद्धाचाच स्थुलातील एक परिणाम आहे. हा विजय अंतिम नाही. कालांतराने अनिष्ट शक्तींच्या विरोधात संतांनी सूक्ष्मातील युद्ध जिंकले की, रजोगुणी शक्तींचा सत्त्वगुणी शक्तींकडून पराभव होईल. त्या वेळी भारतातील सत्त्वगुणी आणि क्षात्रतेज असलेले धर्मप्रेमी लोक हे धर्मक्रांतीत विजय प्राप्त करतील आणि भारतात सत्य सनातन धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची भारतात स्थापना होईल.

सूक्ष्मातील देवासुर लढा हा विषय पूर्णतः बुद्धीअगम्य असून त्याविषयी पुढेही विस्ताराने लिहिता येईल.

२ इ. हिंदु धर्मातील ज्ञानशक्तीचा परिणाम

अध्यात्मशास्त्रानुसार इच्छाशक्ती, क्रियाशक्ती आणि ज्ञानशक्ती हा तीन प्रधानशक्तींद्वारे कार्य होते. आगामी काळात भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना आणि जगभर सनातन धर्माची प्रस्थापना होणे, हा हिंदु धर्मातील तेजस्वी ज्ञानशक्तीचाही परिणाम असेल.

२ इ १. इच्छाशक्ती, क्रियाशक्ती आणि ज्ञानशक्ती यांचे कार्य

हे प्रथम आपण जाणून घेऊया.

अ. इच्छाशक्ती (अंतःप्रेरणा जागृती) : ज्या कार्यात इच्छाशक्तीचा सहभाग अधिक असतो, त्या कार्यातून जनमानसाला कार्य करण्याची प्रेरणादायी शक्ती प्रदान केली जाते.

आ. क्रियाशक्ती (प्रत्यक्ष कार्य होणे) : क्रियाशक्तीमुळे अंतःप्रेरणेतून जागृत झालेली देहातील चेतनाशक्ती प्रत्यक्ष हातून कार्य घडवून घेते किंवा कृतीला चालना देते.

इ. ज्ञानशक्ती (चित्तावर थेट संस्कार) : ज्ञानशक्ती ही थेट चित्तावरच त्या त्या गोष्टीचा अथवा साधनेचा शाश्‍वत संस्कार करण्यास साहाय्य करते.

– एक विद्वान ((पू.) सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून (१.५.२०१४, सकाळी १०.५९))

२ इ २. शक्तींच्या प्रकारानुसार कार्य करण्याचा स्तर, वापर करणारा धर्म, कार्यपद्धत आणि आध्यात्मिक स्तरावर संकल्पाने आणि अस्तित्वाने कार्य होणे

हे आता जाणून घेऊया.

शक्तीचा प्रकार कार्य करण्याचा स्तर वापर करणारा धर्म कार्यपद्धत
इच्छाशक्ती शारीरिक आणि मानसिक इस्लाम शारीरिक कृती
क्रियाशक्ती बौद्धिक ख्रिश्‍चन बोलून दुसर्‍याचे मन जिंकणे,
उदा. ख्रिस्ती मिशनरी
ज्ञानशक्ती आध्यात्मिक हिंदु ज्ञानामुळे कार्य होणे (टीप १)

टीप १ – फुलपाखरे मधासाठी फुलांकडे आपोआप आकृष्ट होतात. त्यांना बोलवावे लागत नाही. त्याप्रमाणे ज्ञानशक्तीकडे काहीजण आपोआप आकर्षिले जातात. सनातन संस्थेच्या संदर्भात याची काही उदाहरणे येथे दिली आहेत.

अ. ग्रंथ : सनातनच्या ग्रंथांच्या जून २०१९ पर्यंत ३१६ ग्रंथांच्या १७ भाषांत ७६ लाख ८६ सहस्र प्रती प्रकाशित झाल्या आहेत. ग्रंथ वाचून हजारोंनी साधनेला आरंभ केला आहे.

आ. ध्वनीचित्रफिती : धर्मशिक्षण देणार्‍या ३७१ ध्वनीचित्रफिती आहेत. त्या पाहून अनेक जणांनी धर्माचरण करण्यास आरंभ केला आहे.

इ. सनातन प्रभात नियतकालिके : यांचेे शेकडो वाचक राष्ट्र आणि धर्म यांच्या प्रत्यक्ष कार्यात सहभागी होत आहेत.

ई. हिंदु जनजागृती समितीचे संकेतस्थळ : याचे १८० हून अधिक देशांत प्रतिमास सरासरी ७ लाख दर्शक (वाचक) आहेत. त्यांतील शेकडो राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यात सहभागी होत आहेत.

उ. स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशनचे संकेतस्थळ : याचे प्रत्येक मासाला ४ लाख वाचक आहेत. त्यांतील हजारोंनी साधना करण्यास आरंभ केला आहे. त्यांतील प्रत्येकी ५० – ६० दर्शक जानेवारी आणि जून मासांत (महिन्यांत) असलेल्या शिबिरांना येतात.

ऊ. आध्यात्मिक स्तरावर संकल्पाने आणि अस्तित्वाने कार्य होणे : संतांच्या संकल्पाने आणि अस्तित्वाने कार्य होते. अनेक संतांचे आशीर्वाद कार्याला लाभले आहेत. काही संत कार्य सफल व्हावे; म्हणून अनुष्ठानेही करत आहेत.

 २ इ ३. धर्मांध अन् जात्यंध, तसेच राष्ट्रप्रेमी अन् धर्मप्रेमी आणि साधक यांचे कार्य

आता जाणून घेऊया.

धर्मांध अन् जात्यंध राष्ट्रप्रेमी अन् धर्मप्रेमी साधक
१. कार्याचा स्तर शारीरिक मानसिक आध्यात्मिक
२. कार्यरत शक्ती इच्छाशक्ती क्रियाशक्ती ज्ञानशक्ती
३. जेथून शक्ती मिळते, तो लोक पाताळ भूलोक महर्लोक आणि जनलोक
४. यश टिकण्याचा कालावधी तात्कालिक ते शेकडो वर्षे काही वर्षे शेकडो ते सहस्रो वर्षे

– (प.पू.) डॉ. आठवले (२२.५.२०१४)

या विवरणावरून चिरस्थानी कार्य होण्यासाठी केवळ क्रियाशक्ती असलेले राष्ट्रप्रेमी अन् धर्मप्रेमी होऊन उपयोगाचे नाही, तर ज्ञानशक्तीच्या स्तरावर कार्य करणारे साधक होणे आवश्यक असते, हे लक्षात येईल.

२ इ ४. इतर पंथियांचे कार्य अधिकतर मानसिक स्तरावरील असल्याने ते काळाच्या ओघात नष्ट होणारे असणे

या संदर्भात ईश्‍वरी अनुसंधानामुळे अध्यात्मातील ज्ञान मिळणार्‍या सौ. अंजली गाडगीळ यांना मी विचारलेल्या प्रश्‍नाचे त्यांनी दिलेले उत्तर येथे दिले आहे.

डॉ. आठवले : इतर पंथीय कोणत्या स्तरावर कार्य करतात ?

एक विद्वान : इतर पंथियांचे कार्य अधिकतर इच्छाशक्तीच्या स्तरावर होत असल्याने ते कनिष्ठ मानसिक स्तरावरील असते. हे कार्य अधिक काळ टिकत नाही; कारण ते मायिक असते. सकामातील कार्यात अधिकतर स्वार्थत्यागापेक्षा स्वार्थालाच खतपाणी मिळत असल्याने हे कार्य संख्याबळाच्या रूपात उठून दिसत असले, तरी काळाच्या ओघात ते नष्ट होणारे असते. तसेच या पंथियांचे आहे.

– एक विद्वान ((पू.) सौ. अंजली गाडगीळयांच्या माध्यमातून (३.५.२०१४, सकाळी १०.१९)

 

३. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सनातनचे योगदान !

सनातन संस्था आणि संस्थेच्या प्रेरणेतून विविध उद्देशांसाठी स्थापन झालेल्या काही संघटना हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी गेली २० वर्षे कार्यरत आहेत. सनातन संस्थेने १९९७ या वर्षी सर्वप्रथम हिंदु राष्ट्राच्या स्थापेनेचे वेळापत्रक प्रसिद्ध केले होते आणि त्यानुसार कार्य करण्यास आरंभ केला होता. या स्थुलातील कार्याचे सूक्ष्मातील ज्ञानाद्वारे केलेले विश्‍लेषण पुढे देत आहे.

३ अ. सनातन संस्थेच्या माध्यमातून वर्षांनुसार साधकांत रोवलेली बिजे,
कार्यरत आध्यात्मिक शक्ती, बीज रोवण्याचे प्रमुख उपक्रम आणि त्यांची फळे

वर्ष बीज कार्यरत आध्यात्मिक शक्ती बीज रोवण्याचे प्रमुख उपक्रम फळ (टीप १)
१. १९८६ – १९९७ साधना इच्छाशक्ती सत्संग सहस्रो (हजारो) साधक तयार होणे (टीप २)
२. १९९८ – २००५ क्षात्रधर्म क्रियाशक्ती सनातन प्रभात नियतकालिके आणि स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्ग अनेकांत क्षात्रतेज निर्माण होणे
३. २००६ – २०१३ हिंदु राष्ट्राची स्थापना क्रियाशक्ती हिंदु धर्मजागृती सभा आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी अखिल भारतीय हिंदू अधिवेशन अनेक हिंदूंना हिंदू राष्ट्राची अपरिहार्यता लक्षात येणे
४. २०१४ – २०२५ अध्यात्म विश्‍वविद्यालय ज्ञानशक्ती विविध साधनामार्ग शिकवणे अपेक्षित फळ – धर्मशास्त्रांचे पुनरुज्जीवन आणि जगभर हिंदु धर्माचा प्रसार

टीप १ : वर्ष १९८६ ते २०१३ या काळात रोवलेल्या बिजांचे फळ अजूनही सातत्याने मिळत आहे.

टीप २ : हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी १०० संत आणि ६० टक्क्यांहून अधिक पातळीचे १००० साधक आवश्यक आहेत. त्यांच्या चैतन्यामुळे पृथ्वीवरील रज-तम न्यून होऊन पृथ्वीची सत्त्वप्रधानता वाढेल.

३ आ. सनातन संस्था, सनातन प्रभात (सनातनचे
नियतकालिक), हिंदु जनजागृती समिती आणि धर्मशक्ती सेना यांच्या
कार्यातील इच्छाशक्ती, क्रियाशक्ती आणि ज्ञानशक्ती, तसेच एकूण शक्ती यांचे प्रमाण (टक्के)

इच्छाशक्ती (प्रमाण – टक्के) क्रियाशक्ती (प्रमाण – टक्के) ज्ञानशक्ती
(प्रमाण – टक्के)
एकूण शक्ती (प्रमाण – टक्के)
१. सनातन संस्था (एकूण) १० १० १० ३०
१ अ. ग्रंथ १० १५ ३०
१ आ. धर्मसत्संग आणि ध्वनीचित्रफिती २० ३०
१ इ. आध्यात्मिक
संशोधन
१० २०
१ ई. सात्त्विक उत्पादने
२. सनातन प्रभात
नियतकालिके
१० १० २० ४०
३. हिंदु जनजागृती समिती (एकूण) २० २० ३० ७०
३ अ. संकेतस्थळ १० २० २० ५०
३ आ. धर्मसभा २० १० ३०
३ इ. शिबिर आणि
हिंदु अधिवेशने
२० ३०
४. धर्मशक्ती सेना (स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्ग) १० १० २०

– (प.पू.) डॉ. आठवले (२२.५.२०१४)

३ इ. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आवश्यक असलेल्या बळांचे
प्रमाण आणि हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांची सद्यस्थिती

पुढील तक्त्यावरून लक्षात येईल की, हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्यात आध्यात्मिक बळाच्या तुलनेत शारीरिक आणि मानसिक बळ बरेच अल्प आहे.

बळ बळांचे आवश्यक प्रमाण (टक्के) हिंदु जनजागृती समिती सनातन संस्था
बळांचे अपेक्षित प्रमाण सद्यस्थिती (जून २०१४) बळांचे अपेक्षित प्रमाण सद्यस्थिती (जून २०१४)
१. शारीरिक

 

३० १ लक्षांश १ लक्षांश
२. मानसिक ३० १५
३. आध्यात्मिक ४० ३० ३० ४० ३१
एकूण १०० ५० ३५ ५० ३५

– (प.पू.) डॉ. आठवले (२९.४.२०१४)

३ ई. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठीच्या कार्यात सनातन परिवारासह विविध संघटनांचा सहभाग

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या यज्ञात अनेक संघटनांना समर्पित होणार्‍या समिधा म्हणून कार्य करावे लागणार आहे. एकूण हिंदु राष्ट्राच्या स्थापनेत या संघटनांच्या सहभागाचे प्रमाण किती असेल, हे पुढील सारणीत दिले आहे.

संघटना सहभागाचे प्रमाण (टक्के)
१. सनातन संस्था
२. सनातन प्रभात
३. हिंदु जनजागृती समिती
४. एस्.एस्.आर्.एफ्.
५. इतर संस्था
५ अ. विविध हिंदुत्ववादी
संघटना
५०
५ आ. विविध संप्रदाय
५ इ. सामाजिक संघटना
६. व्यक्ती २०
एकूण १००

– (प.पू.) डॉ. आठवले (२२.५.२०१४)

 

४. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेपूर्वी घडणार्‍या स्थुलातील प्रक्रिया

आतापर्यंत हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा सूक्ष्मातील प्रक्रियेचा अभ्यास आपण केला. आता हिंदु राष्ट्राच्या स्थापनेपूर्वी घडणारी स्थुलातील प्रक्रिया जाणून घेऊया.

४ अ. अराजकसदृश्य स्थिती

लोकसभेच्या निवडणुकीनंतर केंद्रात नवे शासन सत्तारूढ झाले असले, तरी ते पुढे फारतर ४ वर्षे राज्य करील. त्यानंतर अराजकाला आरंभ होईल. हे अराजक कोणत्याही राजकीय पक्षाला थांबवता येणार नाही. यासाठी हिंदूंनी आतापासून सक्षम आणि बलसंपन्न होणे आवश्यक आहे.

४ आ. धर्मांधांच्या दंगली आणि हिंसाचार

आगामी काळ भीषण असणार आहे. देशाच्या फाळणीच्या वेळी जशा धर्मांधांनी दंगली घडवल्या होत्या, तशा दंगली २ – ३ वर्षांनी भारतभरातील धर्मांध घडवून आणण्यास सुरुवात करतील. प्रत्येक रस्त्यावर हिंदू विरुद्ध जिहादी अशी लढाई होईल. अशा संकटकाळात सत्त्वगुणी हिंदूंच्या रक्षणासाठी करावयाची सिद्धता आपल्याला आजपासून करावी लागेल. दुष्ट आणि पापाचरणी हिंदूंचे रक्षण करणे, हे देशहिताच्या विरुद्ध असल्याने त्यांचे रक्षण करण्याचे दायित्व हिंदूंवर नसेल.

४ इ. तिसरे महायुद्ध

काही वर्षांतच जगात तिसरे महायुद्धचालू होईल. या महायुद्धाची अधिक झळ भारताला बसणार आहे. या युद्धात तमोगुणी आणि रजोगुणी शक्तींचा नाश होईल.

 

५. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे स्थुलातील कार्य

५ अ. निवडणुकीद्वारे नव्हे; धर्मक्रांतीद्वारेच हिंदु राष्ट्र-स्थापावे लागेल !

केंद्रात भाजप सत्तेवर आला असला, तरी भारताची आणि हिंदूंची दुःस्थिती पालटणार नाही. छ. शिवाजी महाराजांनी लोकशाहीने हिंदु राष्ट्र स्थापन केले नाही कि पेशव्यांनी अटकेपार झेंडे फडकवले नाहीत. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे, रणाविना स्वातंत्र्य कोणा मिळाले ? हे उद्गार लक्षात ठेवून धर्मक्रांतीद्वारेच हिंदु राष्ट्र-स्थापावे लागेल !

 ५ आ. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आवश्यक असणारी ५० टक्के सिद्धता २०१८ पर्यंत होईल !

२०१४ च्या पुढची ४ वर्षे सत्त्व-रजप्रधान राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमींनी साधना तळमळीने सुरू ठेवल्यास हिंदू राष्ट्राच्या स्थापनेसाठी लागणारे अपेक्षित बळ २०१८ पर्यंत निर्माण होईल. त्यानंतर मात्र प्रत्यक्ष संघर्षजन्य कृती करून राज्य स्थापणे, त्यासाठी नियमांचे संविधान तयार करणे, प्रत्येक राज्याचा, विभागाचा सुनियोजित आराखडा तयार करणे, प्रत्येक ठिकाणी सुयोग्य आचारसंहिता राबवण्यासाठी प्रयत्न करणे, यांसाठी १०० टक्के प्रमाणात सांघिक बळ आवश्यक असल्याने याची पूर्तता २०२४ या वर्षी होऊन प्रत्यक्ष राज्य-बांधणीतील कार्यभारात स्थिरता येईल.

– एक विद्वान ((पू.) सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून (३.५.२०१४, सकाळी १०.१९))

 

६. संधीकालात धर्मसंस्थापनेचे कार्य करण्याचे महत्त्व !

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे कार्य २०२३ पर्यंत पूर्ण होणार आहे. यापुढील १० वर्षांचा काळ हा संधीकाळ असणार आहे. या काळात सत्त्वगुणी आणि सत्त्व-रजगुणप्रधान व्यक्तींकडून धर्मसंस्थापनेचे, म्हणजेच हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे कार्य करणे अपेक्षित आहे. सूर्योदय, सूर्यास्त, ग्रहणकालादी संधीकालात साधना केल्याने जसा लाभ होतो, तसा लाभ या १० वर्षांच्या संधीकाळात हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे कार्य करणार्‍यांना होईल.

 

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्याचा स्तर,
प्रयत्नांचे स्वरूप, लागणारा कालावधी (वर्षे), आवश्यक
संख्या,  सद्यस्थिती आणि ध्येयासाठी कार्यरत हिंदुत्ववादी संघटना

कार्याचा स्तर प्रयत्नांचे स्वरूप लागणारा कालावधी (वर्षे) आवश्यक संख्या सद्यस्थिती ध्येयासाठी कार्यरत संघटना आणि त्यांचा अपेक्षित सहभाग
१. शारीरिक स्वतःचे शरीर बलवान आणि स्वसंरक्षणात प्रशिक्षित करणे ५,००,००० १० हिंदु जनजागृती समितीची धर्मशक्ती सेना

(टीप १)

अपेक्षित सहभाग : २

इतर हिंदुत्ववादी संघटना

अपेक्षित सहभाग : ९८

२. मानसिक समाजात प्रसार करणे १० ५००० १०० हिंदु जनजागृती समिती (टीप २)

 

अपेक्षित सहभाग : ३

इतर हिंदुत्ववादी संघटना

 

 

अपेक्षित सहभाग : ७०

३. आध्यात्मिक ईश्‍वर प्रसन्न व्हावा, यासाठी साधना करणे २० १०० संत : ४० १ – २ वर्षांत संत होणारे : ६१
सनातन संस्था(टीप ३)
अपेक्षित सहभाग : ३०
इतर हिंदुत्ववादी संघटना

अपेक्षित सहभाग : ७०


टीप १. शारीरिक स्तर :
स्वसंरक्षण प्रशिक्षण इत्यादींच्या माध्यमांतून हे कार्य हिंदु जनजागृती समितीची धर्मशक्ती सेना २००८ या वर्षापासून करत आहे.

टीप २. मानसिक स्तर : ग्रंथ, प्रदर्शने, धर्मसभा इत्यादींच्या माध्यमांतून हे कार्य हिंदु जनजागृती समिती २००२ या वर्षापासून करत आहे.

टीप ३. आध्यात्मिक स्तर : सगळ्यांत अधिक काळ करावे लागणारे आध्यात्मिक स्तराचे कार्य सनातन संस्था १९९१ या वर्षापासून करत आहे, म्हणजे सनातनचे हजारो साधक तन-मन-धनाचा त्याग करून साधना करत आहेत. अनेक साधक संतही झाले आहेत. अनेक इतर संत या कार्यात सहभागी झाले आहेत. वरील तक्त्यावरून लक्षात येईल की, या कार्याची फलनिष्पत्तीही अपेक्षित एवढी आहे.

– (प.पू.) डॉ. जयंत बाळाजी आठवले, सनातन संस्था (२३.५.२०१४)

संदर्भ : दैनिक ‘सनातन प्रभात’

Leave a Comment