श्री पंचायती महानिर्वाणी आखाड्याच्या पेशवाईत परमहंस स्वामी नित्यानंद महाराजांच्या ४७ देशांतील भक्तांचा सहभाग !

* स्थानिक वर्तमानपत्रांत स्वामी
नित्यानंद महाराज यांच्यावर टीकात्मक लेखन

* मिरवणुकीत विदेशी महामंडलेश्‍वर
स्वामी अलखपुरीजी महाराजांचा सहभाग

 
 
akhada_peshvai_kumbh
पेशवाईचे स्वागत करणारे फलक
लावून प्रसार करणारे सनातनचे साधक
 
उज्जैन, २१ एप्रिल (वार्ता.) – येथील सिंहस्थातील पहिले राजयोगी (शाही) स्नान २२ एप्रिल असल्याने त्यापूर्वी प्रत्येक आखाडे आणि खालसे स्वतःची वाजत-गाजत पेशवाई (मिरवणूक) काढत आहेत. अशात सर्वांत लक्षवेधी ठरली ती श्री पंचायती महानिर्वाणी आखाड्याची पेशवाई. यात दक्षिण भारतातील आखाड्याचे महामंडलेश्‍वर परमहंस स्वामी नित्यानंद महाराज यांच्या ४७ देशांतून आलेल्या विदेशी भक्तांनी सहभाग घेतला. यात ब्रिटन, जर्मनी, चीन, रशिया, ऑस्ट्रेलिया, तैवान, फ्रान्स, अमेरिका, मॉरिशस आदी देशांतील भक्तमंडळी सहभागी झाली होती. या संदर्भातील वृत्त देतांना एका राष्ट्रीय वर्तमानपत्राने विवादो के नित्यानंद को ४७ देशों के भक्तों का साथ असे पहिल्या पानावर वृत्त देऊन त्यांची मानहानी केली. तसेच वृत्तात स्वामी नित्यानंद महाराज ५० दिवस कारागृहात राहून आल्याचे म्हटले आहे; मात्र त्यांच्या विरोधात प्रसिद्धीमाध्यमांनी खोट्या बातम्या दिल्यामुळे न्यायालयाने प्रसिद्धीमाध्यमांना खुलासा छापण्याचे निर्देश दिल्याची माहिती दडवून ठेवण्यात आली. (हिंदु संतांच्या अपकीर्तीचे षड्यंत्र रचल्याचा हा पुरावा आहे. अशा प्रसारमाध्यमांवर हिंदूंनी बहिष्कार घालणे आवश्यक ! – संपादक)

कडक उन्हातही भक्तांकडून पेशवाईचे उत्साहात स्वागत ! 

     १८ एप्रिल या दिवशी काढण्यात आलेल्या पेशवाईच्या वेळी ३८ अंश तापमान होते. कडक उन्हातही भक्तांनी उत्साहात पेशवाईचे स्वागत केले. या वेळी काढण्यात आलेल्या पेशवाईमध्ये शारीरिक त्रासामुळे श्री महंत प्रकाशपुरीजी महाराज व्हील चेअर घेऊन सहभागी झाले होते. या वेळी अनेक बँड पथक सहभागी झाले होते. 

कुंभमेळ्यात शक्तीप्रदर्शनाचे माध्यम बनल्या पेशवाई !

     हिमालय, रानावनात उपासना करणारे देशभरातील साधू-संत आणि त्यांचे आखाडे कुंभमेळ्यात प्रवेश करतांना पेशवाई काढतात; मात्र या पेशवाई काढणे हे आता स्वतःचे शक्तीप्रदर्शन करण्याचे साधन बनल्याचे दृष्य दिसत आहे. काही आखाडे, खालसे आणि महामंडलेश्‍वर स्वतःची शक्ती, लोकप्रियता आणि वैभव दाखवण्यासाठी निरनिराळ्या पद्धतीने पेशवाई काढत आहेत. महामंडलेश्‍वरांसाठी फुलांनी सजवलेल्या रथासह सोन्या-चांदीचे सिंहासन, हत्ती, घोडे, बँड पथक यांची मोठ्या प्रमाणावर संख्या वाढवली जात आहे. देशाच्या कान्याकोपर्‍यातून नावाजलेले बँड मागवले जात आहे. काही आखाड्यांनी आदिवासी लोककलाकारांचे पथक बोलावले, तर काहींनी नागा साधूंची घोडस्वारी काढली. 
     या संदर्भात बोलतांना अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत श्री नरेंद्रगिरी महाराज म्हणाले, पेशवाईकडे स्पर्धांच्या दृष्टीकोनातून पाहायला नको. ज्या आखाड्यामध्ये जेवढे महामंडलेश्‍वर आणि साधू असतील, तेवढ्या प्रमाणात त स्वतःचे वैशिष्ट्य दाखवणार; पण ही स्पर्धा नाही. श्रद्धाळू लोक त्यांच्या दर्शनासाठी गर्दी करतात. यामुळे श्रद्धाळूंचा उत्साह वाढतो.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात