टोरेन्टो, कॅनडा येथील थिरूचेंदूर मुरूगन मंदिरात सनातनच्या वतीने सत्संग

सत्कार केल्यानंतर पुजारी आणि इतर यांच्यासमवेत उभ्या असलेल्या सौ. उमा रविचंद्रन्

टोरेन्टो : येथील थिरूचेंदूर मुरूगन मंदिरात २६ मे या दिवशी सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते. दुपारचे अन्नदान झाल्यानंतर मंदिराचे विश्‍वस्त श्री. रत्नेश्‍वरजी यांनी भक्तांसाठी सत्संग घेण्याची विनंती केली होती. या सत्संगाला २० भक्त उपस्थित होते. सत्संगात ‘मंदिरात देवतांचे दर्शन घेण्यामागील शास्त्र, आचारधर्म आणि कलियुगात आवश्यक साधना’ या विषयांवर सनातनच्या साधिका सौ. उमा रविचंद्रन यांनी मार्गदर्शन केले.

क्षणचित्र

मंदिराचे विश्‍वस्त श्री. रत्नेश्‍वरजी आणि त्यांच्या पत्नी यांनी ‘असे सत्संग होणे आवश्यक असून सनातन संस्थेचे कार्य चांगले आहे’, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.