महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने युनिव्हर्सल स्कॅनर (यु.ए.एस्.) उपकरणाद्वारे केलेल्या संशोधनातील काही तांत्रिक संज्ञांचा अर्थ !

१. प्रयोग, चाचण्या, घटक आणि मोजण्यांच्या नोंदी या संज्ञांचे अर्थ

या संज्ञांचे अर्थ सात्त्विक आणि असात्त्विक नक्षी असलेल्या सोन्याच्या अलंकारांचा व्यक्तीवर आध्यात्मिक स्तरावर होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी केलेल्या एका प्रयोगाचे उदाहरण घेऊन त्यातून आपण समजून घेऊया. या प्रयोगात वाईट शक्तींचा त्रास असलेल्या ५ साधिका आणि वाईट शक्तींचा त्रास नसलेल्या ५ साधिका सहभागी झाल्या होत्या. या प्रयोगाच्या संदर्भात प्रयोग, चाचण्या, घटक आणि मोजण्यांच्या नोंदी या संज्ञांचे अर्थ पुढीलप्रमाणे आहेत.

अ. प्रयोग

प्रयोगातील प्रत्येक साधिकेने सात्त्विक नक्षी असलेला हार आणि असात्त्विक नक्षी असलेला हार घालण्यापूर्वी अन् घातल्यानंतर वरील सारणीमध्ये दिलेल्या यंत्रांपैकी एका यंत्राद्वारे (उदा. यु.ए.एस्. उपकरणाद्वारे) केलेल्या मोजण्यांच्या नोंदी करण्यात आल्या. हा एक प्रयोग झाला.

आ. चाचण्या

या एका प्रयोगात सात्त्विक नक्षी असलेल्या हाराचा परिणाम अभ्यासणे आणि असात्त्विक नक्षी असलेल्या हाराचा परिणाम अभ्यासणे, अशा २ चाचण्या आहेत.

इ. घटक

या प्रयोगामध्ये वाईट शक्तींचा त्रास असलेल्या ५ साधिका आणि वाईट शक्तींचा त्रास नसलेल्या ५ साधिका अशा एकूण १० साधिका, म्हणजे १० घटक आहेत.

ई. मोजण्यांच्या नोंदी

या प्रयोगामध्ये प्रत्येक साधिकेच्या संदर्भात तिने सात्त्विक नक्षी असलेला हार घालण्यापूर्वी आणि घातल्यानंतर, तसेच असात्त्विक नक्षी असलेला हार घालण्यापूर्वी अन् घातल्यानंतर, अशा प्रकारे यंत्राद्वारे केलेल्या मोजण्यांच्या एकूण ४ नोंदी करण्यात आल्या. याचा अर्थ १० साधिकांच्या यंत्राद्वारे केलेल्या एकूण ४० मोजण्यांच्या नोंदी झाल्या.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment