परात्पर गुरु डॉ. आठवले हिंदु राष्ट्राचे प्रखर पुरस्कर्ते आहेत. त्यांनी संकलित केलेला ईश्वरी राज्याची स्थापना हा ग्रंथ १८ मार्च १९९९ या दिवशी प्रकाशित झाला. त्यात त्यांनी भारतात ईश्वरी राज्याची (हिंदु राष्ट्राची) स्थापना करणे, हाच हिंदूंच्या सामाजिक, राष्ट्रीय आणि धार्मिक समस्यांवरील एकमेव उपाय आहे, असा विचार मांडला. त्यांनी भावी काळात हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे कार्य कसे होणार, याचे वेळापत्रक मांडतांना द्रष्टेपणाने वर्ष २०२३ मध्ये भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना होईल, असा विचार मांडला. अनेक संत अन् नाडीभविष्याच्या माध्यमातून महर्षीही आता हेच सांगत आहेत. वर्ष १९९८ पासून परात्पर गुरु डॉ. आठवले हे ग्रंथसंकलन; सनातन प्रभातसाठी राष्ट्र आणि धर्म या विषयांवर लिखाण करणे; हिंदुत्ववाद्यांना दिशादर्शन करणे; ब्राह्मतेज असलेले संत घडवणे आदी माध्यमांतून अविरतपणे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे कार्य करत आहेत.
अखिल मानवजातीसाठीचे कार्य
केवळ भारतातच हिंदु राष्ट्र स्थापून धर्मसंस्थापना होणार नाही, तर मानवजातीच्या हितासाठी जगभरात हिंदु धर्म प्रस्थापित करणे आवश्यक आहे, हा विचार परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मांडला. वर्ष १९९५ मध्ये त्यांना प.पू. भक्तराज महाराजांनी जगभर अध्यात्माचा प्रसार करा, असा आशीर्वाद दिला होता. त्याला अनुसरून ते जगभर मानवजातीच्या हितासाठी विविध माध्यमांद्वारे हिंदु धर्म, अध्यात्मशास्त्र, साधना आदींचा प्रसार करत आहेत.
तुलसीदास, मीराबाई, ज्ञानेश्वर, तुकाराम यांसारखे संतश्रेष्ठ देशात असतांना अन् त्यांच्या डोळ्यांदेखत धर्मांध मुसलमान आणि ख्रिस्ती यांचे हिंदूंवर अत्याचार होत असतांना त्यांनी हिंदू राष्ट्र-स्थापनेसाठी प्रयत्न का केले नाहीत ? हा प्रश्न प.पू. डॉक्टरांनी त्यांचे गुरु प.पू. भक्तराज महाराज यांना विचारला होता. त्यांनी उत्तर दिले, भक्त आणि शिष्य यांना धर्मशिक्षण देऊन आणि त्याप्रमाणे साधना करावयास लावून त्यांना मोक्षमार्ग दाखवणे, हे संतांचे काम आहे. दुर्जनांचा संहार करणे, हे अवतारांचे कार्य आहे.
– (पू.) डॉ. वसंत बाळाजी आठवले (अप्पाकाका), चेंबूर, मुंबई.


परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या
राष्ट्र-धर्म कार्याची प्रेरणा घेऊन चालू झालेले कार्य
अ. हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी हिंदु जनजागृती समिती
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या विचारांतून प्रेरणा घेऊन ७ ऑक्टोबर २००२ या दिवशी हिंदु जनजागृती समितीची स्थापना झाली. धर्मशिक्षण, धर्मजागृती, धर्मरक्षण, राष्ट्ररक्षण, हिंदूसंघटन आदींद्वारे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे कार्य करणे, हे समितीचे ध्येय आहे. समिती करत असलेल्या कार्यामुळे पुढील परिणाम साध्य झाले आहेत.
१. सर्वधर्म सभा, सर्वसंप्रदाय सभा आणि नामदिंड्या यांद्वारे सांप्रदायिक ऐक्य साध्य !
२. हिंदु धर्मजागृती सभा आणि हिंदूसंघटन मेळावे यांद्वारे लाखो हिंदूंमध्ये धर्मजागरण !
३. स्वसंरक्षण आणि प्रथमोपचार प्रशिक्षणवर्ग, तसेच आपत्कालीन साहाय्य अभियान यांद्वारे समाजसाहाय्य !
४. Hindujagruti.org या संकेतस्थळाच्या प्रतिमाह ८ लाखांपेक्षा अधिक वाचकांमध्ये राष्ट्र-धर्म जागृती !
५. प्रांतीय, राज्यस्तरीय आणि अखिल भारतीय हिंदू अधिवेशनांद्वारे २५० हून अधिक राष्ट्रप्रेमी अन् धर्मप्रेमी संघटनांचे संघटन !
६. धर्मप्रेमी महिलांच्या संघटनासाठी हिंदु जनजागृती समितीची रणरागिणी शाखा कार्यान्वित ! (स्थापना : सप्टेंबर २००९)
आ. सनातन साधक-पुरोहित पाठशाळा
सात्त्विक आणि धर्मशिक्षण देणारे साधक-पुरोहित निर्माण करणारी सनातन साधक-पुरोहित पाठशाळा (स्थापना : ३० एप्रिल २००८)
इ. Balsanskar.com
हे संकेतस्थळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी संकलित केलेल्या बालसंस्कार ग्रंथमालिकेतील ज्ञानावर आधारित आहे. (स्थापना : १६.३.२०१०)
ई. हिंदु विधीज्ञ परिषद
राष्ट्र आणि धर्म यांच्या हितासाठी लढणार्या धर्मप्रेमी अधिवक्त्यांची संघटना हिंदु विधीज्ञ परिषद
(स्थापना : १४ जून २०१२)
उ. सनातन अध्ययन केंद्र (स्थापना : १ डिसेंबर २०१५)
विविध परिसंवाद, कार्यक्रम आणि दूरचित्रवाहिन्यांवरील चर्चासत्रे यांमध्ये हिंदु धर्माची बाजू मांडण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे वक्ते आणि प्रवक्ते यांना वैचारिक साहाय्य देण्याचे कार्य सनातन अध्ययन केंद्राद्वारे केले जाते.
संत, संप्रदाय, हिंदुत्ववादी, देशभक्त आणि सामाजिक
कार्यकर्ते यांचे संघटन अन् त्यांना दिशादर्शन करणारे कार्य
संघटनकार्य
संत : परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वर्ष २००१ ते वर्ष २००५ या काळात अनेक संतांच्या भेटी घेऊन त्यांना राष्ट्र-धर्म रक्षणासाठी उद्युक्त केले. वर्ष २००५ नंतर त्यांचे प्रकृतीस्वास्थ्य उत्तम नसल्याने त्यांनी या कार्यासाठी प्रवास केला नाही. असे असले, तरी सध्या राष्ट्र-धर्म रक्षणासाठी प्रत्यक्ष कार्य करणार्या संतांचे संघटन सनातनचे संत पू. डॉ. चारुदत्त पिंगळे, तर राष्ट्र-धर्म रक्षणासाठी आध्यात्मिक स्तरावर कार्य करणार्या संतांचे संघटन पू. (सौ.) अंजली गाडगीळ हे दोघे अव्याहतपणे करत आहेत.
संप्रदाय : राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी विविध संप्रदायांनी संघटित व्हावे, यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पुढाकार घेऊन महाराष्ट्र अन् गोवा राज्यांत जाहीर सर्वसंप्रदाय सत्संग आयोजित केले. त्यांनी प्रसारमाध्यमे विविध संप्रदायांचे प्रमुख असलेल्या संतांची अपकीर्ती करत असतांना त्यांच्या भक्तांना आधार दिला.
देशभक्त आणि हिंदुत्ववादी : वर्ष २०११ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी देशभक्त आणि हिंदुत्ववादी यांच्या संघटनातूनच हिंदु राष्ट्र-स्थापनेचे कार्य होऊ शकते. यासाठी भारतभरातील राष्ट्रप्रेमी आणि हिंदुत्ववादी संघटनांना एकत्रित करणारे व्यासपीठ असावे, असा विचार सर्वप्रथम मांडला. या
विचारांतून प्रेरणा घेऊन सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती संयुक्तपणे वर्ष २०१२ पासून प्रतिवर्षी गोवा येथे अखिल भारतीय हिंदू अधिवेशन, तर अन्यत्र राज्यस्तरीय अन् जिल्हास्तरीय हिंदू अधिवेशने आयोजित करत आहेत.
सामाजिक कार्यकर्ते : हिंदु राष्ट्र-स्थापनेतील समाजाचा प्रत्यक्ष सहभाग वाढावा, यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी माहितीच्या अधिकारासाठी कार्य करणार्या संघटना, भ्रष्टाचारविरोधी संस्था, अश्लीलता-विरोधी संघटना, निवृत्त पोलीस अन् लष्करी अधिकार्यांच्या संघटना, ज्येष्ठ नागरिक संघ, महिला मंडळे आदींच्या संघटनाचे कार्य चालू केले आहे.
दिशादर्शन : परात्पर गुरु डॉ. आठवले हे जिज्ञासू हाच ज्ञानाचा अधिकारी या न्यायाने संत, संप्रदाय, हिंदुत्ववादी, देशभक्त आणि सामाजिक कार्यकर्ते यांना साधना, हिंदु राष्ट्र-स्थापना, हिंदुत्वाच्या कार्याविषयीचे योग्य दृष्टीकोन, काळाच्या दृष्टीने कार्याची यशस्विता आदींविषयी दिशादर्शन करतात. (हिंदु राष्ट्र-स्थापनेविषयीची सविस्तर माहिती सनातनच्या ईश्वरी राज्याची स्थापना, हिंदु राष्ट्र का हवे ? आणि हिंदु राष्ट्र-स्थापनेची दिशा ! या ग्रंथांत दिली आहे.)