हिंदू मुलांपेक्षा मुसलमान युवक अधिक धर्माभिमानी ! – स्वामी परमानंद, ज्योतिषाचार्य

उज्जैन येथे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती
यांनी लावलेल्या प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर दिलेली प्रतिक्रिया

Paramanand-Maharaj
स्वामी परमानंद

माझा जन्म काशी येथे झाला असून मी पुणे विद्यापिठातून रसायनशास्त्रातील पदविका घेतली आहे. आमचे महाराष्ट्रात धुळे जिल्ह्यात, तर मध्यप्रदेशात धार जिल्ह्यात आश्रम आहेत. मी कथाकार आहे. मी भागवत, रामायण, शिवपुराण आणि देवी भागवत यांवर कथा करतो. या कथेच्या माध्यमांतून तरुण युवकांना बोधपर मार्गदर्शक ठरील, असे माझ्या प्रत्येक कार्यक्रमात युवकांना सांगण्याचा प्रयत्न करतो; परंतु मी अयशस्वी ठरतो.

      मी भरपूर दिवसांपासून चिंतीत आहे; कारण आजच्या हिंदु युवा पिढीला ना धर्माची ओढ, ना मंदिरांची, तर याउलट मुसलमान युवकांसह ५-६ वयोगटातील लहान-लहान मुले यांना इस्लाम धर्म काय किंवा त्यांची शिकवण आचरणात आणण्याविषयी सांगायची आवश्यकता लागत नाही; कारण त्यांना धर्मशिक्षण दिले जाते. आपले युवक मंदिरात जात नसतील; पण ती मुले न चुकता मशिदीत जातात. ५ वेळा नमाज पढतात.

     मुसलमान महिला त्यांच्या संस्कृतीप्रमाणे बुरखा घालणे आदी कृती आनंदाने करतात. याउलट हिंदु युवा पिढी पाश्‍चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण करत फॅशनच्या नावाखाली अंगप्रदर्शन करते. ही फॅशन इतकी असते की, ख्रिस्त्यांनाही लाज वाटेल. अशा गोष्टीमुळेच मी चिंतीत असतो. येणार्‍या भविष्यात येणार्‍या भावी पिढीचे काय होईल, असे वाटायला लागले आहे.

    मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडलेलो आहे. हिंदु जनजागृती समितीच्या या कार्यात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त करतो. शांती आणि समाधान पाश्‍चात्त्य संस्कृतीत नाही, तर सनातन हिंदु संस्कृतीत आहे, असा माझा पूर्ण विश्‍वास आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात