वीरव्रती पू. श्री प्रबलजी महाराज यांच्या जन्मदिनी त्यांची हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने भेट !

उज्जैन सिंहस्थ पर्व !

Induji-Maharaj-Yana-bhet-detana-P_Pingalekaka_Clr
इंदूजी महाराज यांना कुंभपर्व की महीमा हा ग्रंथ भेट देतांना पू. डॉ. चारुदत्त पिंगळे
Prabalji-Maharaj_yana-bhet-detana-P_Pingalekaka_Clr
वीरव्रती पू. श्री प्रबलजी महाराज यांना भेटवस्तू देतांना पू. डॉ. चारुदत्त पिंगळे
Shridhar-Maharaj_yanchyashi-charcha-karatana_Clr
तपोनिष्ठ श्रीधरजी महाराज यांना संस्थेच्या कार्याविषयी माहिती सांगतांना पू. डॉ. चारुदत्त पिंगळे

    उज्जैन – श्री धर्मसम्राट विश्‍ववंद्य श्री यतिराज शिरोमणी हरिनंदनजी करपात्रीजी महाराज यांचे शिष्य वीरव्रती पू. श्री प्रबलजी महाराज यांच्या जन्मदिनी त्यांची हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे आणि सनातन संस्थेच्या महाराष्ट्र प्रसारसेविका पू. (कु.) स्वाती खाडये यांनी त्यांच्या आश्रमात जाऊन हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी अन् साधकांच्या साधनेसाठी आशीर्वाद घेतले.

    या वेळी संस्थेच्या वतीने सनातननिर्मित शिवाचे सात्त्विक चित्र, पुष्पहार आणि श्रीफळ भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी पू. श्री प्रबलजी महाराज यांनी बराच वेळ शिवाचे चित्र निरखून पाहिले आणि पू. डॉ. पिंगळेकाका यांचा सन्मान केला अन् बहोत अच्छा, असे म्हणून आशीर्वाद दिला. पू. श्री प्रबलजी महाराजांचे शिष्य श्रद्धेय प्रवर पूज्य श्री त्रंबकेश्‍वर चैतन्यजी महाराज म्हणाले की, सनातन संस्थेच्या कार्याविषयी बोलण्यास शब्दच नाहीत.

हिंदु राष्ट्राची स्थापना होण्यासाठी
आणि सनातन संस्थेचे साधक पुढे जाण्यासाठी
भगवान बद्रीनाथजी यांच्या चरणी प्रार्थना करणार !
– इंदू आश्रमजी महाराज, ज्योर्तिमठ, बद्रीकाश्रम, हिमालय

    या वेळी पू. श्री प्रबलजी महाराज यांना भेटण्यासाठी आलेले इंदूजी महाराज (ज्योर्तिमठ, बद्रीकाश्रम, हिमालय) यांची हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे आणि सनातन संस्थेच्या महाराष्ट्र प्रसारसेविका पू. (कु.) स्वाती खाडये यांनी त्यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले.

या वेळी संस्था आणि समिती यांच्या कार्याची थोडक्यात माहिती त्यांना देण्यात दिली. या वेळी त्यांना सनातननिर्मित कुंभपर्व की महीमा हा हिंदी ग्रंथ, पुष्पहार आणि श्रीफळ देऊन संस्थेच्या वतीने भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी महाराजांनी प.पू. डॉक्टरांविषयी जिज्ञासने बराच वेळ माहिती जाणून घेतली. या वेळी इंदूजी महाराज म्हणाले की, हिंदु राष्ट्र आणि सनातन संस्थेचे साधक पुढे जाण्यासाठी भगवान बद्रीनाथ यांच्या चरणी प्रार्थना करीन. तसेच तुमचे बद्रीनाथ येथे येणे झाल्यास आश्रमाला भेट द्यावी.

तपोनिष्ठ श्रीधरजी महाराज यांची भेट !

    या वेळी पू. श्री प्रबलजी महाराज यांना भेटण्यासाठी आलेले जगन्नाथपुरी येथील श्री श्री १००८ श्री ब्रह्मनिष्ठ गोवर्धन पीठाधिश्‍वर श्री निरंजनदेवतीर्थ शंकराचार्यजी महाराज, यांचे शिष्य श्रीमद् ब्रह्मचारी तपोनिष्ठ श्रीधरजी महाराज (बिकानेर आणि मध्यप्रदेश) यांची हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे आणि सनातन संस्थेच्या महाराष्ट्र प्रसारसेविका पू. (कु.) स्वाती खाडये यांनी भेट घेतली. या वेळी महाराजांना कुंभपर्व की महीमा हा हिंदी ग्रंथ, पुष्पहार आणि श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. या वेळी महाराजांची कार्यासाठी आशीर्वाद दिले

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात