स्वामी नारायण संप्रदायाच्या वतीने पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांचा सत्कार !

Swami-Nrugendraprasad-Maharaj-v-Pushvendraprasad-maharaj-sanman-kartana-PPingalekaka-2_Clr
पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांचा पुष्पहार घालून सन्मान करतांना स्वामी नारायण संप्रदायाचे प.पू. १०८ आचार्य श्री नृगेंद्रप्रसादजी महाराज आणि १०८ छोटे लालजी श्री पुश्‍वेंद्रप्रसादजी महाराज

     उज्जैन – पहिल्यांदाच उज्जैन सिंहस्थ पर्वासाठी आलेले स्वामी नारायण संप्रदायाचे नववे वंशज प.पू. १०८ आचार्य श्री नृगेंद्रप्रसादजी महाराज आणि १०८ छोटे लालजी श्री पुश्‍वेंद्रप्रसादजी महाराज यांच्या शुभहस्ते हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांचा पुष्पहार घालून सन्मान करण्यात आला.

     या वेळी अन्य क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. स्वामी नारायण संप्रदायाचे वकील स्वामी उपस्थित होते. या वेळी देशभरात हिंदुजागृतीचे मोठे कार्य करणारी सनातन संस्था आहे, असे गौरवोद्गार वकील स्वामी यांनी काढले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. अप्पासाहेब सांगोलकर उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात