सनातनच्या कार्यात अडचणी येणार; पण देव सनातनच्या पाठीशी आहे ! – पू. सत्विदानंदजी महाराज, निजानंद धाम, खाचरोड, उज्जैन

Satvidanand-Maharaj_2_col
पू. सत्विदानंदजी महाराज यांचा सन्मान करतांना (डावीकडून) पू. (डॉ.) चारुदत्त पिंगळे

 
     राष्ट्र आणि धर्म यांसाठी कार्य करणार्‍या प्रत्येकाला काही न काही अडचणींना समोरे जावेच लागणार. सनातनच्या पाठीशी प्रत्यक्ष देवच उभा आहे. तुम्ही तुमचे कार्य चालू ठेवा. देव तुम्हाला साहाय्य करत रहाणार. सर्व साधकांना माझा आशीर्वाद आहे, असे प्रतिपादन खाचरोड, उज्जैन येथील निजानंद धामचे पू. सत्विदानंदजी महाराज यांनी केले. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने उज्जैन सिंहस्थ सिंहस्थक्षेत्री लावण्यात आलेल्या प्रदर्शनाला भेट दिल्यावर ते बोलत होते. या वेळेस हिंदु जनजागृती समितीचे श्री. आनंद जाखोटिया यांनी प्रदर्शनाची माहिती सांगितली, तर हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांच्या हस्ते पुष्पहार आणि श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात