उज्जैन सिंहस्थपर्वाच्या ठिकाणी सनातन संस्थेच्या प्रदर्शनस्थळी गुढीपूजन !

उज्जैन – सनातनकडून सिंहस्थ पर्वामध्ये लावण्यात आलेल्या प्रदर्शनाच्या ठिकाणी साधूसंतांच्या वंदनीय उपस्थितीत गुढीपूजनाचा कार्यक्रम भावपूर्ण वातावरणात पार पडला.

संतांनी दिलेले आशीर्वचन

१. श्रीलक्ष्मण चैतन्यजी महाराज

 या कुंभमेळ्यात आपल्याला साधूसंतानी सांगितलेल्या मार्गावरून वाटचाल करायची आहे, तसेच शिवाजी महाराज, संत तुकाराम, संत एकनाथ महाराज यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवायचा आहे.

२. श्रीजितेंद्रानंदजी महाराज

आपण महाकालेश्‍वराच्या चरणांशी आलो आहोत. आपण समाजाला जागृत करण्याचे कष्ट घ्यायचे आणि श्रीकृष्णाने सांगितल्याप्रमाणे कर्मफळाची अपेक्षा ठेवायची नाही.

३. श्रीराजेश्‍वरानंदजी महाराज

 रुढीपरंपराचे पालन करणे समाजाला शिकवण्यासाठी आवश्यकच आहे; पण त्याबरोबरच साधकाने व्यक्तीगत साधनेचे महत्त्व जाणून त्याकडे लक्ष केंद्रीत करायला हवे. आपल्यातील रामतत्त्व जागृत केल्यानेच खर्‍या अर्थाने गुढीपाडवा साजरा होईल.