उज्जैन येथील सिंहस्थ कुंभपर्वाच्या निमित्ताने सनातन संस्थेकडून ग्रामदेवतेच्या पूजनाने धर्मप्रसाराच्या सिद्धतेला प्रारंभ !

      उज्जैन – २२ एप्रिलपासून चालू होणार्‍या येथील सिंहस्थ कुंभपर्वात सनातन संस्थेच्या वतीने धर्मप्रसार करण्यासाठी प्रदर्शन लावण्यात येणार आहे. हे कार्य करण्याची शक्ती मिळावी आणि ते निर्विघ्नपणे पार पडावे, यासाठी २८ मार्च या दिवशी सिंहस्थ कुंभपर्वाच्या सिद्धतेसाठी आलेल्या सर्व साधकांनी स्थानदेवता श्री काळभैरव देवाला प्रार्थना केली. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी नारळ वाढवला, तर सनातन संस्थेच्या सौ. सुधा बिलावर यांनी श्री काळभैरव देवाचे पूजन केले. त्यानंतर साधकांनी कुंभपर्वासाठी मिळालेल्या ठिकाणी जाऊन स्थानदेवतेची पूजा केली. सर्वदिशा, स्थानदेवता आणि ग्रामदेवता यांना प्रार्थना करण्यात आली. या वेळी पूजेसाठी लावलेल्या दिव्याची ज्योत वारा असूनही स्थिरपणे तेवत होती, तसेच ती मोठीही झाली होती. यातून ‘सर्व देवतांनी ही प्रार्थना स्वीकारली’, अशी साधकांनी अनुभूती घेतली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात